रत्नागिरी – सर्व नागरिकांपर्यंत रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व जनजागृतीपर उपक्रमांची तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहचावी, यासाठी सध्या प्रभावी ठरेल, या उद्देशाने रत्नागिरी पोलिस दलाच्या यु ट्यूब चॅनेलचे जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, परिविक्षाधीन पोलीस उप अधीक्षक डॉ. समाधान पाटील उपस्थित होते.
रत्नागिरी पोलीस दल आता लोकाभिमुख होतेय. नागरिकांशी संवाद साधण्याचे समाजमाध्यम प्रभावी माध्यम असल्याने आता पोलिस दलामार्फत जनजागृतीसाठी राबविले जाणारे उपक्रमही फेसबुक, ट्विटर, इन्स्ट्राग्राम यांच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचविले जात आहे. रत्नागिरी पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व जनजागृतीपर उपक्रमांचा तसेच सामान्य जनतेपर्यंत अत्यावश्यक संदेश व माहिती पोहचविण्याकरिता ट्यू ट्यूब चॅनेल हे प्रभावी असल्याने रत्नागिरी पोलीस दलातर्फे यु ट्यूब चॅनेलची निर्मिती करण्यात आली आहे.
Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.