
संगमेश्वर :-शास्त्रीपूल (वार्ताहर) संगमेश्वर कसबा, येथील छावा मराठा संघटनेचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आणि ज्येष्ठ पत्रकार श्री वहाब दळवी यांनी दि. २८.९. २०२३ रोजी संगमेश्वर येथील संगमेश्वर पोलीस स्थानकात भेट देवून पोलीस ठाण्यात स्थापन झालेल्या गणरायांचे दर्शन, घेतले यावेळी पोलीस निरिक्षक मा. सुरेश गावित यांनी की यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. यावेळी दिनेश आंब्रे यांनी पोलीस निरिक्षक श्री सुरेश गावित यांना आरती संग्रह पुस्तक व पुष्प गुच्छ देवून सन्मान केला.यावेळी पत्रकार श्री धनाजी भांगे, श्री विशाल रापटे, श्री प्रसाद सदलगे आदी उपस्थित होते.
त्यानंतर वहाब दळवी यांनी संगमेश्वर निडळेवाडी येथील नवोदित गायिका कु. गौतमी वाडकर, माजी सरपंच अविकर वाडकर श्री योगेश देवलाटकर .
संगमेश्वर नावडी येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश हरीभाऊ आंब्रे यांची घरी विराजमान झालेल्या गणरायांचे दर्शन घेतले . सामाजिक कार्येकर्ते संजय धोंडू शिंदे आदि. मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन दर्शनाचा लाभ घेतला.