जेएसडब्लू फाऊंडेशन व जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळाचा संयुक्त उपक्रम.
जनशक्तीचा दबाव न्यूज । रत्नागिरी । एप्रिल 10, 2023.
जिल्हा विज्ञान शिक्षक मंडळ व जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय औषधी वनस्पती पी.पी.टी. व नोंदवही स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. सलग तिसऱ्या वर्षी आयोजित स्पर्धेला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धेसाठी जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशनचे अनिल दधिच यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. नोंदवही स्पर्धेत पाचवी ते आठवी गटात कोतवडेतील विजयसिंहराजे पटवर्धन इंग्लिश स्कूलच्या कु. प्रचिती हरिश्चंद्र पातये, नववी व दहावी गटात विश्वनाथ विद्यालय लवेल येथील कु. अमेय अनिल लोहार, अकरावी – बारावी गटात अभ्यंकर – कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या कु. ऋचा सुरेंद्र पाटील यांनी तर पी.पी.टी. स्पर्धेत सहावी ते आठवी गटात गुरुवर्य रामचंद्र पुरुषोत्तम जोग संजीवनी गुरुकूलच्या कु. मृणांक पाडाळकर, श्रीदेव गोपाळकृष्ण विद्यामंदिर गुहागरच्या कु. केतकी भालचंद्र निमकर, अकरावी बारावी गटात न्यू इंग्लिश स्कूल लांजाच्या कु. आर्यन मंदार काळोखे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला. नोंदवही स्पर्धेचे परीक्षण श्री. विजयानंद निवेंडकर, श्री. आनंद खांडेकर, श्री. संजय घाडी, श्रीम. संघमित्रा कुरतडकर यांनी तर पी.पी.टी.चे परीक्षण श्रीम. संपदा धोपटकर यांनी केले. सर्व सहभागी व यशस्वी विद्यार्थ्यांचे जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशनचे श्री. अनिल दधीच विज्ञान शिक्षक मंडळाचे जिल्हाध्यक्ष श्री. रवींद्र इनामदार, उपाध्यक्ष श्री. राजू जानकर, कार्यवाह श्री. प्रभाकर सनगरे, विज्ञान शिक्षक मंडळ व जे.एस.डब्ल्यू. फाऊंडेशन सर्व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.
नोंदवही स्पर्धेचा सविस्तर निकाल-
आठवी ते दहावी गट- द्वितीय- कु. मोहा विनोद कांबळे (पटवर्धन हायस्कूल रत्नागिरी), तृतीय- कु. संप्रह हेमंत यादव(रा.भा.शिर्के प्रशाला रत्नागिरी), उत्तेजनार्थ- कु. जागृती काभय चव्हाण (शिवाजीराव उर्फ बाबासाहेब सुर्वे विद्यालय निवळी ता.चिपळूण), कु. सुयश समीर चांदिवडे (विश्वनाथ विद्यालय लवेल) नववी-दहावी गट- द्वितीय- कु. सिद्धी संतोष जाधव व कु. जान्हवी केशव मायदेव (श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्यालय गुहागर) तृतीय- कु. श्रुती सुधाकर जोशी (माध्यमिक विद्यालय वरवडे) उत्तेजनार्थ- कु. प्राची शंकर पळसमकर (माध्यमिक विद्यालय वडदहसोळ- राजापूर), कु. सानिका सुभाष करंजकर(न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर काॅलेज आंबडस) अकरावी-बारावी द्वितीय- कु. सानिका पंकेश आपणकर (डाॅ. बी. आर. तथा दादासाहेब सामंत ज्युनिअर काॅलेज) तृतीय- कु. पुजा शशिकांत सोड्ये (गोडे-दाते कनिष्ठ महाविद्यालय राजापूर) उत्तेजनार्थ- कु. विभक्ती राजेश निवळकर (श्रीमती पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय, वाटद- खंडाळा), कु. श्रावणी भाटकर व कु. मानसी गुरव (डाॅ.बी.आर. तथा दादासाहेब सावंत ज्युनिअर काॅलेज)
पीपीटी स्पर्धेचा सविस्तर निकाल-
पाचवी ते आठवी- द्वितीय- कु. पार्थ संतोष भोसले (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं. ४), तृतीय- कु. कैवल्य संजय कुलकर्णी (छत्रपती शिवाजी आदर्श विद्यामंदिर देवरुख नं. ४), उत्तेजनार्थ- कु. मिहीर प्रियदर्शन कोवरकर (ए.जी. हायस्कूल, दापोली), कु. दुर्वा हेमंत चव्हाण अकरावी बारावी- द्वितीय- कु. वरेश राजेश पुसाळकर तृतीय- कु. पुर्वा शंकर जाधव (अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालय रत्नागिरी)