
मुंबई (शांताराम गुडेकर ) – वर्ल्ड वाइड ह्यूमन राईट्स ए.एफ व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे संस्थापक/अध्यक्ष मा.डॉ.अविनाशजी सकुंडे यांच्या आदेशानुसार व AIACPC चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष किशोर ठाणेकर यांच्या सूचनेनुसार व वर्ल्ड ह्यूमन राईट्स ए.एफ (WHRAF) चे राष्ट्रीय अध्यक्ष व ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र दगडु(दादा) सकपाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनेच्या वतीने कामगार कल्याण मंडळ हॉल, सद्गुरु भालचंद्र महाराज क्रीडांगण, चिंचपोकळी (पूर्व),मुंबई येथे गरीब गरजू मुलांसाठी मोफत वह्या व पेन वाटप करण्यात आले. याप्रसंगी WHRAF चे नवनियुक्त मुंबई अध्यक्ष प्रकाश वाणी व नवनियुक्त उपाध्यक्ष सचिन भांगे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ऑल इंडिया अँटी करप्शन पार्लमेंट कमिटीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष अमोल वंजारे,महाराष्ट्र सचिव सौ.ज्योतीताई भोसले, WHRAF मुंबई सचिव महेश आंब्रे,AIACPC च्या मुंबई सहसचिव सौ.ऋतिका पंदुगडे,मुंबई सह सचिव साक्षत मात्रे,IHRAO चे सुहास परब,सौ.वसुधा वाळुंज,श्री.राजाराम झगडे व पालक उपस्थित होते.