कर्जत- अ.पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, यांच्या माध्यमातून आज कर्जत तालुक्यातील नेरळ भडवल विद्यालय, येथील शालेय विद्यार्थी यांना खेलाच साहित्य वाटप करण्यात आले, मुख्याध्यापक श्री बजरंग काशिनाथ म्हात्रे,सरांनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी यांचे अभार मानले,,,
शालेय विद्यार्थी यांना खेला साठी आवश्यक साहित्य नसल्याचे समजताच अ. पोलिस सुरक्षा परिषद ऑफ इंडिया नवी दिल्ली, महाराष्ट्र प्रदेश कमिटी अध्यक्ष श्री रतन वसंत लोंगळे यांनी पुढाकार घेऊन,आपण मुलांसाठी शाळेसाठी साहित्य च नियोजन करू आणि तत्काळ साहित्य जमा करून आपल्या टीम च्या माध्यमातून स्कूल मध्ये वाटप करण्यात आले, शालेय विद्यार्थी संख्या १०५ आहे, अशा वेळी मुलांच्या मुखातून हास्य उमटले,
मुलांनाही खेळण्या साठी साहित्य मिळालं त्या मधे फूट बॉल,दोरी उडी, बॅडमिंटन, टेनिस बॉल लगोरी प्लास्टिक चेंडू, छोटे बॅडमिंटन ,छोट्या मुलांसाठी हॉकी स्ट्रिक, प्रत्येकी दोन दोन सेट देण्यात आलेआणि चॉकलेट, या वेळी भडवल विद्यालय चे मुख्यधापक श्री बजरंग काशिनाथ म्हात्रे, सह शिक्षक श्री जगदिश अंबाजी घरत, श्री देविदास दौलत सोनवणे, श्री नवनाथ नारायण डमाले, त्याच प्रमाणे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर साळोखे, प्रदेश कमिटी अध्यक्ष रतन वसंत लोंगळे, कर्जत तालुका सचिव कु प्रफुल जाधव, मेंबर अविनाश शिर्के, उपस्थित होते