ओम साई गणेश मित्र मंडळ मुंबई यांच्या वतीने कनकाडी येथील प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप …

Spread the love

संगमेश्वर:  अर्चिता कोकाटे/ नावडी- तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनकाडी, गराटेवाडी, शिंदेवाडी जि. प. शाळा कनकाडी  जोशी वाडी,  जि.प.शाळा कनकाडी वरची वाडी,  गुरववाडी जि. प.प्रा. शाळा कनकाडी,  खालची गुरववाडी,  जि.प. प्रा. शाळा गोपाळवाडी इत्यादी ठिकाणी ओम साई गणेश मित्र मंडळ ( रजि. )सांताक्रुज मुंबई या संस्थेच्या वतीने 98 विद्यार्थ्यांना वहया,  पेन, तक्ते तसेच खाऊ इत्यादींचे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले.
     
मान्यवर म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व अध्यक्ष,  सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,  अंगणवाडी सेविका तसेच माजी उपसरपंच हेमंत शिंदे,  ग्रामपंचायत सदस्य विलास सुकम,  योगेश रांधावन ,  दीपक शिंदे, सुनील भिंगार्डे, राकेश रांधावन, तुषार शिंदे, राज शिंदे, अभिजीत शिंदे, आशिष भिंगार्डे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.


      

मुख्याध्यापकांनी शाळेच्या वतीने मंडळाचे अध्यक्ष सुधीर माने, उपाध्यक्ष मोहन कांबळे,  सचिव सतीश सावंत, सहसचिव तानाजी कोंडस्कर,  सहसचिव संदेश सुवारे,  सल्लागार तुकाराम सुवारे व संजय लांबोर तसेच सरिता सुवारे या संस्था पदाधिकाऱ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. सर्व मुख्याध्यापक व पालक वर्ग यांनी ओम साई गणेश मित्र मंडळाचे स्तुत्य उपक्रमाबद्दल आभार मानले.

    
अध्यक्ष सुधीर माने यांनी मनोगत व्यक्त करताना गेली बारा वर्ष मंडळ राबवित असलेल्या मानव कल्याण उपक्रमाची उपस्थितांना माहिती दिली. यामध्ये गरजू व्यक्तींना गाणगापूर, पंढरपूर, शिर्डी, अक्कलकोट,शेगाव,देहू,आळंदी इत्यादी ठिकाणी मोफत तसेच कमीत कमी खर्चात तीर्थक्षेत्री दर्शनासाठी नेले होते तसेच छत्रीवाटप गरजूंना अन्नधान्य वाटप मुलांना दत्तक घेणे इस समावेश आहे. त्यांनी विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page