एकल पालक विद्यार्थांना समाजसेवक शरद भावे यांच्यातर्फे शैक्षणिक साहित्य वाटप….

Spread the love

मुंबई (शांताराम गुडेकर )

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखाध्यक्ष आणि रस्ते आस्थापना व साधन सुविधा प्रभाग संघटक शरद भावे यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून आज एस जी टूटोरियल क्लासेस येथे एकल पालक असलेल्या विद्यार्थांना शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी क्लासेसचे संचालक मारुती जाधव , सत्कर्म फाऊंडेशनचे संचालक दत्तात्रय सावंत आदी उपस्थित होते. शरद भावे हे दरवर्षी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून विविध सामाजिक उपक्रम घेतात. गेली दहा वर्ष ते वाढदिवशी गरजू विद्यार्थांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करत आहेत. वाढदिवशी कोणताही केक व पार्टी अशा कार्यक्रमाचे नियोजन न करता केवळ सामाजिक उपक्रम घेऊन वाढदिवस साजरा करतो असे शरद भावे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
समाजात भेडसावत असल्या अनेक समस्या सोडवणे, आपली युवा पिढी चांगले उच्चशिक्षण घेऊन मोठं मोठे हुद्यावर असणे.मोठया कंपनी मध्ये उच्च पदावर कार्यरत राहून स्वतः ला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे. अनेक होतकरू विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे, दरवर्षी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करणे, दरवर्षी गावी वृक्षारोपण करणे, स्वच्छता अभियान राबविणे असे अनेक उपक्रम राबवत समाजाला नवप्रेरणा देण्याचे काम मा.शरद भावे साहेब सातत्याने करत आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page