पितृ पंधरवड्यातील मदतीचा व सामाजीक जाण असलेला एक स्तुत्य उपक्रम!
*श्रीकृष्ण खातू / संगमेश्वर –* सद्ध्या पितृ पंधरवडा चालू असून मातृ पितृ प्रेम , भक्ती व भावना अबाधीत रहावी,या उद्देशाने प्रत्येकाकडून आपल्या गेलेल्या आईवडिलांसाठी तिथीचे आयोजन करण्यात येते.अशाच हेतूने चिपळूण मधील असुर्डे येथील समाजसेवक ,दानशूर, व पोलीस तपास साप्ताहिकाचे सहसंपादक सुरेश साळवी व सुजया साळवी या उभयतांनी पितृ पंधरवड्या निमित्ताने आपल्या मातृ व पितृ प्रेम व भक्तीभावा करीता संगमेश्वर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनावश्यक उपयोगाचे साहित्य वाटप करून मातपित्यांची कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी उपस्थित समाज सेवक सुरेश साळवी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले की,मी माझ्या आईवडिलांमुळेच आज विविध क्षेत्रात काम करत असून त्यांच्या पुण्याईमुळेच इथपर्यत सुखी जीवनाचा प्रवास करुन शेवटच्या क्षणापर्यत आईवडिलांची सेवा केली असून त्यांच्या पश्चात सुद्धा यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा छोटासा माझा प्रयत्न केला आहे. तसेच वसतीगृहातील मुलांची देखभाल व योग्य निमंत्रण राखले जात असून महेंद्र जाधव यांचे खूप कौतुकही करून समाधान व्यक्त करत असल्याचे नमूद केले. या प्रसंगी उपस्थित प्रमुख पाहुणे संगमेश्वर ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष प्रमोद शेट्ये यांनी मनोगतात
या उपक्रमाबद्दल कौतुक करून डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मनामनात रूजवण्याचे व त्यांचे गुण आत्मसात करण्याचे आवाहन केले.
यानिमित्ताने सौ.साळवी ,श्रीकृष्ण खातू यांनीही विद्यार्थ्याना मौलीक मार्गदर्शन केले. तसेच ओझरखोल येथील गरजू वयोवृद्ध दापंत्य दत्ताराम यद्रे व जयश्री यद्रे यांनाही त्यांच्या घरी जावून जीवनावश्यक साहित्य व कपडे यांचे वाटप केले.व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. व्यासपिठावर सुरेश साळवी, सुजया साळवी,प्रमोद शेट्ये, माजी सरपंचा नम्रता शेट्ये, महेंद्र जाधव उपस्थित होते. वसतीगृहाची सविस्तर माहिती अगदी तळमळीने व निस्वार्थीपणे महेंद्र जाधव यांनी सांगून या कार्यक्रमाचे सूत्रसंचलनही त्यांनी केले, व सर्वाना धन्यवाद दिले.