
संगमेश्वर अर्चिता कोकाटे /नावडी- तालुक्यातील डेरवण येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर मधील पैसा फंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इयत्ता आठवीतील अजिंक्य अमोल शिंदे व इयत्ता नववीतील प्रथमेश सुजित शेट्ये या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करून सुयश प्राप्त केले.
पैसा फंड हायस्कूल संगमेश्वर चा क्रीडा स्पर्धेमध्ये चढता आलेख..
गेली अनेक वर्ष पैसा फंड इंग्लिश स्कूल क्रीडा क्षेत्रामध्ये हायस्कूलचा चढता क्रम आहे. क्रीडा शिक्षक आणि शाळेतील शिक्षक वृंद विशेष कामगिरी करत आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी तालुका जिल्हा राज्य स्तरावर चांगली कामगिरी करत आहेत. प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे आणि सर्व शिक्षकांचे मेहनतीमुळे आणि अध्यक्ष व कमिटीमुळे सदरचे यश शाळेला अनेक वर्ष मिळत आहे.

जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धेत संगमेश्वर मधील पैसा फंड इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी इयत्ता आठवीतील अजिंक्य अमोल शिंदे व इयत्ता नववीतील प्रथमेश सुजित शेट्ये या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक मिळून सुयश प्राप्त केले आहे. सदर सत्कार केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी आभार मानले यापुढे स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी बळ मिळण्याचे त्यांनी सांगितले.
प्रशालेचे क्रीडा शिक्षक नवनाथ खोचरे यांचे या विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांची निवड विभागीय स्पर्धेसाठी झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये, सचिव धनंजय शेट्ये, मुख्याध्यापक सचिन देव खामकर, ज्येष्ठ शिक्षक प्रकाश दळवी, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते दिनेश अंब्रे आणि गायत्री परिवाराकडून यांनी प्रशालेला भेट देऊन दोन्ही विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू व पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला . सामाजिक कार्यकर्ते गणेश मारुती पवार ( कोंड असुर्डे ) व गायत्री परिवारा हरिद्वार चे रत्नागिरी सिंधुदुर्ग चे प्रतिनिधी सुधीर माने ( शिपोषी) यांच्या शुभहस्ते गौरव केला.
🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️🔹️

🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर
