अवंती दामले, आहारतज्ज्ञ आणि सल्लागारत्वचा नितळ व निरोगी असल्यास कोणत्याही प्रकारच्या सौंदर्यप्रसाधनांची आवश्यकता भासत नाही. चांगल्या जीवनशैलीचा आपला त्वचेवर परिणाम होत असतो. त्वचेवर हार्मोनल असंतुलन, आतड्याचे अनारोग्य, ताण-तणाव व अपुरी झोप, धूम्रपान व मद्यसेवन, विशिष्ट औषधं, ॲलजी, प्रदूषण इत्यादी सर्वांचा विपरीत परिणाम दिसू लागतो. त्यामुळे त्वचा काळवंडते, त्वचेवर पिंगमटेशन दिसतं, मुरूम येतात, त्वचा निस्तेज दिसते.
त्वचेसाठी आहारातील महत्त्वाचे बदलआहारामध्ये हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करावे. त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स त्वचेला चमक आणण्यास मदत करतात.आहारात क जीवनसत्त्वयुक्त फळांचा समावेश करावा. लिंबू, संत्री, मोसंबी, आवळा, आलुबुखार, स्ट्रॉबेरी, पेरू या फळांपासून मिळणाऱ्या क जीवनसत्त्वामुळे, त्वचेला सूर्यकिरणामुळे होणाऱ्या हानीला आळा बसतो व नवीन पेशी निर्माण घेण्यास मदत होते.बदाम, अक्रोड, तेलबिया, जवस इत्यादीतल्या ओमेगा -३ फॅटी ॲसिडमुळे त्वचेला पोषण मिळते.चांगल्या त्वचेसाठी पाणी हा महत्त्वाचा घटक आहे. घाम, उच्छ्वास, मल-मूत्र याद्वारे शरीरातून विषारी, अपायकारक पदार्थ बाहेर टाकले जातात. त्यामुळे पाण्याचे प्रमाण योग्य राखले पाहिजे.कोलॅजेन निर्मितीसाठी प्रथिनांचा सहभाग असतो. वनस्पतिजन्य व प्राणिजन्य प्रथिने उदाहरणार्थ, डाळी, उसळी, सोयाबीन, अंडी, मासे, चिकन या सर्वांपासून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे कोलॅजेनची निर्मिती होण्यास मदत होते आणि त्वचेचा पोत चांगला राहतो.लोह क्षारांमुळे शरीरामध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होतो. योग्य ऑक्सिजन पुरवठ्यामुळे त्वचेचे आरोग्य चांगले राखले जाते. म्हणून आहारात पालेभाज्या, काळ्या मनुका, अंजीर, खजूर, अळीव यांचा समावेश करावा.
उत्तम त्वचेसाठी हे करादिवसाची सुरवात आवळा/ लिंबू रस कोमट पाण्यातून घेऊन करावी.आहारात बदाम, अक्रोड, जवस, भोपळ्याच्या बिया यांचा वापर करावा.किमान पन्नास-साठ मिनिटे घाम येईपर्यंत व्यायाम करावा.सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशात ड जीवनसत्त्व मिळण्यासाठी उभे राहावे.प्रथिनयुक्त आहार घ्यावा. त्यात वेगवेगळ्या डाळी, उसळी नॉन-व्हेज अन्नपदार्थांचा समावेश करावा.ऋतूप्रमाणे, स्थानिक फळे सालासकट, चोथ्यासकट खावीत.पाणी किमान बारा-चौदा ग्लास प्यावे.ताण-तणाव कमी करण्यासाठी बागकाम, नृत्य, वाद्य वाजवणे, पाळीव प्राण्याबरोबर वेळ घालवावा.किमान सात-आठ तासांची शांत झोप यावी आणि ब्लू स्क्रीन लाईटचा वापर मर्यादित करावा.श्रमपान व मद्यपान टाळावे.