मोदी अफ्रिकेला इंडियन मुजा-हिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून गेले होते का? उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

Spread the love

महाराष्ट्र: मला पंतप्रधान नरेंद्र मोदींना प्रश्न विचारायचा आहे की, काल परवा मोदी अफ्रिकेत गेले होते. मोदी मणिपूरमध्ये गेले नाही तरी हरकत नाही, पण ते दक्षिण आफ्रिकेला गेले. मग मोदी तिकडे ‘प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया’ म्हणून गेले होते, भारत मातेचे, इंडियाचे पंतप्रधान म्हणून आफ्रिकेला गेला होतात, की इंडियन मुजाहिद्दीनचे प्रतिनिधी म्हणून तिकडे गेला होतात? हे त्यांनी सांगावं,” असा सवालही ठाकरेंनी केला.

“एनडीएचा आता अमिबा झाला आहे”

“अमिबा नावाचा एकपेशीय जीव पोटात गेला की पोट बिघडतं. तो एकपेशीय असतो, पण त्यालाही आकार उकार काही नसतं. तो कसाही वाढत असतो, तशीच स्थिती एनडीएची झाली आहे. एनडीएचा आता अमिबा झाला आहे. यांच्याबरोबर मुळात पक्ष आहेच किती. पक्ष फोडून केवळ थिगळं लावून एनडीए उभी केली जात आहे,”

आपल्याही दाढीवाल्याने भाजपा वॉशिंग पावडर लावली”

“हे दुसऱ्यावर भ्रष्टाचाराचे, देशद्रोहाचे आरोप करतात आणि तेच लोक यांच्या पक्षात आले की, धुवून साफ होतात. पूर्वी निरमा वॉशिंग पावडर होती, आता भाजपा पावडर आहे. आपल्याही दाढीवाल्याने ही पावडर लावली आहे. ही पावडर लावल्यावर सगळे साफ झाले आहेत,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लावला.

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

जाहिरात

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page