
रोज रोज काय करायचं भाजीला या प्रश्नानं तुम्हीह कंटाळला असाल तर काळजी करु नका. आम्ही तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आलो आहोत. ढाब्यावर जेवायला सगळ्यांनाच आवडतं आज आम्ही तुम्हाला अशीच ढाला स्टाईल सोया चाप मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत.
- २ वाटी भिजवलेल्या सोया छोट्या वड्या
- २ कांदे दोन टोमॅटो बारीक चिरलेले
- १० लसूण एक इंच बारीक ठेचून ठेवलेलं
- १ टेबल स्पून तेल
- १ चमचा मालवणी मसाला एक चमचा कांदा लसूण मसाला पाव चमचा हळद
- थोडीशी कोथिंबीर धुवून बारीक कापलेली
- चवीनुसार मीठ सुपारी एवढा गुळ
- १/२ चमचाजिर, (१/२ चमचा) मोहरी चिमूटभर हिंग दहा कढीपत्त्याची पाने
सोया मसाला कृती
भाजीचा कुकर गॅसवर ठेवून त्यामध्ये तेल घालावे तेल गरम झालं की हिंग मोहरीची जिर कडी पत्ता यांची खमंग फोडणी करावी
मग त्यामध्ये कांदा टोमॅटो आले लसूण टाकून छान परतावे त्यात हळद मालवणी मसाला कांदा लसूण मसाला घालून तेल सुटू लागलं की भिजत भिजलेले सोया घालून छान परतावे गुळ मीठ घालावे व पुढे गरम पाणी घालून कुकर चे झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या कराव्यात.
कुकर थंड झाला की झाकण काढून त्यावर कोथिंबीर पेरावी व एक उकळी काढून गॅस बंद करावा गरम गरम भाकरी पोळी भाताबरोबर आपण हे खाऊ शकतो अतिशय टेस्टी सुंदर असे सोया मसाला तयार होतो
