
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातील देवरूखची ग्रामदेवता व तब्बल ४४ खेड्यांची मालकीण असलेल्या सोळजाई देवीचा प्रसिद्ध देवदिवाळी व लोटांगण यात्रा कार्यक्रम आज शुक्रवारी उत्साहात संपन्न झाला.
नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी सोळजाई देवीची ख्याती आहे. देवदिवाळीला शुक्रवारी सोळजाईच्या प्रसिद्ध लोटांगण यात्रेला दुपारी ३.३०ला प्रारंभ झाला. सोळजाई देवीचे मानकरी, पुजारी, ट्रस्टी व हजारो भाविकांच्या उपस्थितीत लोटांगण यात्रेला मोठ्या उत्साहात सुरवात झाली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही भक्तांनी लोटांगणे घालत आपले नवस फेडले. लोटांगण यात्रेला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांनी यात्रेचा आनंदही लुटला. ही यात्रा सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती. लोटांगण यात्रेची ही परंपरा अनेक वर्षांपासून चालत आली आहे आणि या दिवशी देवरुखमध्ये जत्रेचे स्वरूप आलेले असते.

🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️
🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..
➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)
➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर