
देवरुख- देवरुखची राष्ट्रीय तायक्वाँदो खेळाडू कु. सिद्धी राजेंद्र केदारी हिने सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठाने घेतलेल्या एम-सेट(महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) ही सहाय्यक प्राध्यापक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. सिद्धी हिने शारीरिक शिक्षण(फिजिकल एज्युकेशन) या विषयातून ही परीक्षा पास केली आहे. सिद्धी केदारी सध्या भारतातील सुप्रसिद्ध चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, पुणे येथे द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. सिद्धी ही देवरूखचे व्यावसायिक राजेंद्र केदारी व रश्मी केदारी यांची कनिष्ठ कन्या आहे.
सिद्धी हिचे पदवीपर्यंतचे शिक्षण देवरुख येथे झाले असून, तिने प्राथमिक शिक्षण जि. प. शाळा, देवरुख नं. ४ मधून, तर माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख मधून पूर्ण केले. यानंतर सिद्धीने आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालय सन २०१९ मध्ये १२वी कला शाखेतून उत्तीर्ण केल्यानंतर, सन २०२२ मध्ये बी.ए. पदवी संपादन केली. सन २०२४ मध्ये बी. पीएड. पदवी चंद्रशेखर आगाशे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन, पुणे मधून प्राप्त केली. सिद्धीला तायक्वाँदो खेळात विशेष रुची असून, तिने वयात ७व्या वर्षापासून तायक्वांदो खेळायचा श्रीगणेशा केला. सिद्धीने सन २०१८-१९ मध्ये आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयातून राष्ट्रीय शालेय तायक्वाँदो स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केले होते. सिद्धीने एकूण ७ वेळा राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊन २ सुवर्ण, १ रौप्य व २ कांस्यपदकाला गवसणी घातली आहे.
सिद्धीने आपल्या यशाबद्दल बोलताना सांगितले की, तिने स्वयं अध्ययनावर अधिक भर दिला, तसेच प्राथमिक शिक्षणापासून आजपर्यंत शिक्षणाच्या विविध टप्प्यांमध्ये मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुजनांचा महत्त्वाचा वाटा स्वतःच्या यशात असल्याचे नम्रतापूर्वक नमूद केले.भविष्यात शारीरिक शिक्षण व खेळ या विषयात उज्वल यश संपादन करून, याच क्षेत्रात नवीन पिढीला मार्गदर्शन करण्याची इच्छा तिने व्यक्त करून नवीन पिढीसाठी प्रेरणास्थान बनायला आवडेल अशी भावना व्यक्त केली. स्वतःच्या कुटुंबासह, क्रीडा मार्गदर्शक शशांक घडशी, विविध स्पर्धा परीक्षांकरिता मार्गदर्शन व प्रोत्साहन देणारे मंगेश खेडेकर या सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
सिद्धीच्या यशाचे संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, नेहा जोशी, कृष्णकुमार भोसले, शिरीष फाटक, सुजाता प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून सिद्धीच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️⬜️🟥🟧🟨🟩🟦🟪🟫⬛️🟥

*🎤 जनशक्तीचा दबाव न्यूज..*
*➤ (RNI NO. MAHMAR/2014/59698)*
*➤ भारत सरकारमान्य रजिस्टर न्यूजपेपर*
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
*अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी https://chat.whatsapp.com/Fz2GJdNzxjp7ru6fTzARHp?mode=ems_copy_t कम्युनिटी लिंक मध्ये सामील व्हा*
*आपल्याला प्रतिनिधी बनायचे असल्यास , बातम्या पाठवायच्या असल्यास किंवा आपल्यावर अन्याय होत असल्यास आम्ही आपल्या पाठीशी उभे राहू आम्हाला 8928622416 मोबाईल नंबर वर कॉन्टॅक्ट करा व माहिती द्या..*
*“जनशक्तीचा दबाव न्यूज”च्या बातम्या मिळविण्यासाठी 7400104268 आणि 8928622416 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.*
*मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी janshakticha dabav वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट janshaktichadabav.com वर नक्कीच व्हिजिट करा…*

