
*देवरुख/प्रतिनिधी-* देवरुख सोळजाई देवस्थान नेहेमी विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहन देत असते,देवरुख मध्ये शिक्षणाच्या चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत, शिक्षणा बरोबरच क्रीडा क्षेत्रासाठी आत काम करायचे आहे,असे मत आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केले.
.
देवरुखची ग्रामदेवता श्री देवी सोळजाई ग्रामदेवी देवस्थान तर्फे दहावी,बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा भेटवस्तु देवून गौरव करण्यात आला. ७५ विद्यार्थ्यांना यावेळी गौरवण्यात आले यावेळी श्री निकम बोलत होते.
देशासाठी कार्य करा,चांगले अधिकारी आता आपल्या तालुक्यातुन घडत आहेत. चमकदार कामरीसाठी सर्वांनी मुलांना प्रोत्साहन दिले पाहीजे. पालक सक्षम आहेतच पण आमदार म्हणून आपणही जे लागेल ते सहकार्य करु असे श्री निकम यांनी सांगितले.
नुकतीच आपण लातुरच्या शाहु काॅलेजला भेट दिली तिथे सायंकाळ झाली तरी मुले,मुली मिळेल त्या जागेत बसुन अभ्यास करत होती.त्यांना न्यायला आलेले पालकही गेटबाहेर शांत बसलेले पाहीले.हे आपल्याकडे असे व्हायला हवे असे निकम यांनी सांगितले. जिद्द,मेहनत, चिकाटीने कार्य करा यश तुमचेच आहे असेही निकम यांनी सांगितले.
देवरुख परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी देवस्थानतर्फे गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो.
या गुणगौरव सोहळ्याला आमदार शेखर निकम,माजी जि.प.अध्यक्ष रोहन बने,सदानंद भागवत,देवस्थानचे अध्यक्ष बापु गांधी,संतोष लाड,गीते भाउ,बांडागळे गुरुजी,प्रकाश घस्ते,भाउ कांगणे,सौ.स्मिता लाड,स्नेहल यशवंतराव,बाबू शेट्ये,तुकाराम किर्वे,शांताराम कांगणे,अभिजीत शेट्ये,आनंद पर्शराम,ए.टी.भुवड,हनिफ हरचिरकर,प्रफुल्ल भुवड,बाळू ढवळे,रवींद्र राजवाडे,पंकज पुसाळकर,राजु वणकुंद्रे,आदिंसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.गीते गुरुजी,बांडागळे गुरुजी,प्रकाश घस्ते,सौ.स्मिता लाड,स्नेहल यशवंतराव,बाबू शेट्ये,तुकाराम किर्वे,शांताराम कांगणे,अभिजीत शेट्ये,आनंद पर्शराम,ए.टी.भुवड,हनिफ हरचिरकर,प्रफुल्ल भुवड,बाळू ढवळे,रवींद्र राजवाडे,पंकज पुसाळकर,आदिंसह देवस्थानचे पदाधिकारी उपस्थित होते.मान्यवरांनी मुलांचे कौतुक करताना देवरुख शहराचे नाव प्रत्येक क्षेत्रात झळकेल अशी कामगिरी करा,तसेच स्पर्धेच्या युगात वावरताना चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला.पालकांच्या ईच्छेला न्याय द्या असे अवाहन केले. मान्यवरांनी मुलांचे कौतुक करताना देवरुख शहराचे नाव प्रत्येक क्षेत्रात झळकेल अशी कामगिरी करा,तसेच स्पर्धेच्या युगात वावरताना चांगल्या गोष्टींचे अनुकरण करण्याचा सल्ला दिला.पालकांच्या इच्छेला न्याय द्या असे आवाहन केले.
बिहारमध्ये सातत्याने स्पर्धा परीक्षा होत असतात म्हणुन तेथील मुले अधिकारी होत आहेत.आपल्याकडे स्पर्धा परीक्षेसाठी अशी तयारी झाली पाहीजे असे निकम यांनी सांगितले.
*श्री सोळजाई मंदिर देवस्थानची २५ गुंठे जमिन आहे या ठिकाणी एक चांगला हाॅल व्हावा असे संतोष लाड यांनी प्रस्तावनेत सांगितले होते. यावर या हाॅलसाठी जास्तीत जास्त निधी आपण उपलब्ध करुन देवू असे अभिवचन दिले.*