
जनशक्तीचा दबाव न्यूज | देवरुख | मार्च २९, २०२३.
देवरूख नगर पंचायत क्षेत्रातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एक खंदे कार्यकर्ते म्हणून ओळख असणाऱ्या श्री. गणेश मोहिते यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला. आगामी नगरपंचायत निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी कॉंग्रेस, देवरुखला हा मोठा धक्का असल्याचे राजकीय वर्तुळात विश्लेषण केले जात आहे.
देवरुख नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ४ मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी त्यांनी भरीव कार्य केले आहे. शिवाय मागील निवडणुकीत याच प्रभागातून दुसऱ्या क्रमांकाची मते प्राप्त करणारे उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या विचारसरणीवर यापुढे कार्य करणार असल्याने प्रभाग ३ व ४ मध्ये भाजपला मजबुती प्राप्त झाली आहे. श्री. गणेश मोहिते यांच्या प्रवेशासाठी माजी उपनगराध्यक्ष, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्हाध्यक्ष श्री. दीपक पटवर्धन यांनी श्री. गणेश मोहिते यांचे स्वागत व अभिनंदन केले आहे.
यावेळी तालुकाध्यक्ष श्री. प्रमोद अधटराव, नगराध्यक्षा सौ. मृणाल शेट्ये, उपनगराध्यक्ष श्री. वैभव कदम, शहराध्यक्ष श्री. सुशांत मुळ्ये, ओबीसी आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्री. अभिजीत शेट्ये, भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष श्री. रूपेश कदम, माजी शहराध्यक्ष श्री. सुधीर यशवंतराव, ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंदराव जोशी, भाजपाचे सर्व नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.