देवरूख नगरपंचायतीस सन्मानचिन्ह आणि दहा कोटी रुपयांचे बक्षिस
मुंबई (शांताराम गुडेकर)
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील देवरुख नगरपंचायतीला शहर सौंदर्यकरण स्पर्धेमधे राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे.मुंबई येथे नगरविकास दिनाचे औचित्य साधून आज मुख्यमंत्री श्री.एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांच्याहस्ते व शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर व विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या उपस्थितीत शहर सौदर्यकरण स्पर्धेचा बक्षिस वितरण सोहळा पार पडला. यामध्ये देवरुख नगरपंचायतीस राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
सन्मानचिन्ह आणि दहा कोटी रुपये असे या बक्षिसाचे स्वरुप आहे.देवरुख नगराध्यक्षा सौ.मृणाल शेटये, मुख्याधिकारी श्री.चेतन विसपुते, उपनगराध्य श्री.वैभव कदम,नगरसेवक श्री.संतोष केदारी,माजी उपनगराध्यक्ष श्री.अभिजीत शेटये यांनी हा पुरस्कार स्वीकारला.देवरुख नगरपंचायतीला शहर सौंदर्यकरण स्पर्धेमधे राज्यात नगरपंचायत विभागात द्वितीय क्रमांक मिळाल्याने नगरपंचायतीचे अभिनंदन करण्यात येत आहे.