
*संगमेश्वर:- अर्चिता कोकाटे-* संगमेश्वर मधील नावडी येथील माजी सैनिक पाल्य तथा कायदासाथी यांनी देवरुख चव्हाण आळी तसेच कांजिवरा येथे विद्यार्थ्यांची निवासस्थानी जाऊन दहावी सुयश प्राप्त झालेले विद्यार्थी जान्हवी महेश चव्हाण न्यू इंग्लिश स्कूल देवरुख गुण 80. 40% भाविका अमर चव्हाण गुण70%
तसेच कांजीवरा येथील कुमार मकरंद धनवंत चव्हाण 80%( कै.सौ. मीनाताई ठाकरे माध्यमिक विद्यालय साडवली )
या गुणवंत विद्यार्थ्यांचा अतिथी उदय (बंधू) कोळवणकर यांच्या शुभहस्ते कुलवंत,भक्ती सोपान,आदर्श परिवार ही पुस्तक तसेच शालेय साहित्य स्वरूपात देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी पालक महेश चव्हाण (ऑडिटर) मानसी चव्हाण,ज्येष्ठ नागरिक विजय चव्हाण, प्रतिमा अमर चव्हाण, धनश्री धनवंत चव्हाण, धनवंत चव्हाण,संगमेश्वर तालुका नाभिक समाज संघाचे अध्यक्ष अभिजीत चव्हाण उपस्थित होते. विद्यार्थ्यांना प्रेरणा व प्रोत्साहन तसेच भावी शैक्षणिक वाटचालीसाठी दिनेश अंब्रे यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.
सत्कार कार्यक्रमाचे आयोजन कायद्यासाथी दिनेश अमरे यांनी केले होते. वृक्षारोपण गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याची मदत तसेच खेडोपाडी पोहोचून विद्यार्थी सशक्तिकरण व कायदेविषयक मार्गदर्शन असे उपक्रम हाती घ घेतल्याचे यावेळी कायदासाथी श्री.दिनेश हरिभाऊ अंब्रे यांनी म्हटले आहे.