आज पासून नवरात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ
देवरुख:- सालाबाद प्रमाणे आंबव गावचे ग्रामदैवत श्री कालिश्री देवीचा नवरात्र उत्सव आज प्रतिपदेपासून सुरू झाला.
सर्व देवतांना विविध वस्त्रालंकार परिधान करून नयनरम्य मनमोहक असे असे सुंदर सजविण्यात आले आहे.
हे रूप भाविकांना पाहण्यासाठी आकर्षित करीत आहे. करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिराच्या धर्तीवर रोज नवीन वस्त्रालंकार परिधान केले जातात. दुर्मिळ असे हे रूप पाहण्यासाठी हजारो भाविक दररोज आंबव गावी येत असतात.
नवसाला पावणारी न्याय प्रधान आणि विशेष म्हणजे माहेरवासीणींची अतिशय श्रद्धा असणारी अशी ख्याती असणारी आंबव गावच्या ग्रामदेवतेच्या नवरात्र उत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. भाविकानी या उत्सावाला आणि मंदिराला जरुर जरुर भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.