मुख्यमंत्रिपदाची देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेतली. यावेळी निवर्तमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजित पवार यांनीही उपमुख्यमंत्री पदाची पुन्हा शपथ घेतली.
मुंबई – महायुतीचा आज भव्यदिव्य असा शपथविधी सोहळा सायंकाळी आझाद मैदान इथं पार पडला. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, जे पी नड्डा, नितीन गडकरी यांच्यासह दिग्गज मान्यवर उपस्थित आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्याचबरोबर शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1864650223261294898?s=19
शपथविधी समारंभाला शाहरुख खान, सलमान खान, सचिन तेंडुलकर, संजय दत्त, माधुरी दीक्षित, श्रीराम नेने, रणवीर सिंग, मुकेश अंबानी, अनंत अंबानी, अमित शाह, नितिश कुमार, योगी आदित्यनाथ, निर्मला सितारामण, ज्योतिरादित्य शिंदे, अनिल अंबानी, रणबीर कपूर, नितीन गडकरी, शिवराज सिंह चौहान, सुनिल तटकरे, आसिष शेलार, रामदास आठवले, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासह इतरही अनेक मान्यवर उपस्थित आहेत.
या कार्यक्रमाला नेते अभिनेत्यांसह सर्वच पक्षाचे नेते उपस्थित होते. त्याचबरोबर राज्यभरातून आलेले कार्यकर्तेही यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. राज्याच्या सर्वच भागातून या शपथविधी सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी कार्यकर्ते हजर होते.
संगीतकार अजय अतुल यांनी आपल्या अनेक वीररसानं भारलेल्या गाण्यांचे सादरीकरण केलं. यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं आगमन झालं तेव्हा उपस्थितांनी जल्लोष केला. शपथविधी सोहळ्याची सुरुवात पोलीस बँडच्या वतीनं राष्ट्रगीतानं झाली. त्यानंतर महाराष्ट्र गीताचं सादरीकरण झालं. या सादरीकरणाच्या दरम्यान सर्व उपस्थितांनी उभ राहून राष्ट्रगीताचा सन्मान केला.