भाजपच्या सहकार आघाडीमध्ये प्रदेश संयोजक म्हणून नियुक्ती
रत्नागिरी : भाजपा प्रदेश कार्यकारिणी च्या नाशिक येथील बैठकीत ॲड. दीपक पटवर्धन जिल्हा अध्यक्ष यांचा राज्य फेडरेशन कार्याध्यक्षपदी निवड झाल्या बद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे हस्ते सत्कार झाला.
नाशिक येथे दिनांक ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रदेश भाजपा कार्यकारिणी बैठकीत ॲड. दीपक पटवर्धन जिल्हा अध्यक्ष यांचा सत्कार देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री महाराष्ट्र तसेचं प्रदेशाध्यक्ष भाजपा चंद्रशेखर बावकुळे यांचे हस्ते महाराष्ट्र राज्य पत संस्था फेडरेशन च्या कार्याध्यक्ष पदी ॲड. पटवर्धन यांची निवड झाल्या बद्दल करण्यात आला.
सहकार क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचे पक्षाचे धोरण आणि योजना आखण्यात आली असताना आमदार दरेकर यांच्या नेतृत्वाखाली सहकार आघाडी ची स्थापना झाली त्या आघाडी मध्ये प्रदेश संयोजक म्हणून ही ॲड. पटवर्धन यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.
ना. फडणवीस यांनी शुभेच्छा देत सहकारातले रचनात्मक काम सुरू ठेवा अश्या शुभेच्छा दिल्या आ. बावनकुळे यांनीही कौतुका ची थाप ॲड. पटवर्धन यांना दिली. या प्रसंगी भाजपा वरिष्ठ नेते मंत्रिमंडळातील मंत्री व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
जाहिरात :