
जनशक्तीचा दबाव न्यूज | मार्लेश्वर | ऑक्टोबर १०, २०२३.
श्री क्षेत्र मार्लेश्वर, ता. संगमेश्वर येथील धारेश्वर धबधब्याशी निगडीत असलेल्या विकासकामांना संगमेश्वर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या निरंतर पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध झाला आहे. यामध्ये धारेश्वर धबधब्याकडे जाणारी पाखाडी, टॉयलेट ब्लॉक व चेंजिंग रूमचे बांधकाम करणे या कामांचा समावेश असून यासाठी ७०.१३ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी आमदार, सिंधुरत्न समिती सदस्य व लोकसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोदजी जठार यांच्या पुढाकाराने आणि जिल्हाध्यक्ष राजेशजी सावंत, विधानसभा निवडणूक प्रमुख श्री. प्रमोद अधटराव, माजी जि.प. अध्यक्षा सौ. रश्मीताई कदम, नवनियुक्त संगमेश्वर (दक्षिण) तालुकाध्यक्ष रूपेश कदम आदी मंडळींच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा निधी मंजूर झाला असल्याने ग्रामस्थांनी भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.