
संगमेश्वर अर्चिता कोकाटे /नावडी- चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील प्रतिष्ठित नागरीक व व्यापारी चंद्रकांत कारेकर यांचे सुपुत्र पियुष कारेकर हा नीट परीक्षेत ७०० पैकी ४५७ गुण मिळवून उत्तीर्ण झाला. त्यामुळें त्याचा कोंड असुर्डे येथे त्याच्या आजोळी छोटेखानी पुस्तक,भेट व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी प्रमुख उपस्थित कोंड असुर्डे गावचे प्रतिष्ठित नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश पवार, तसेच कायदा साथी दिनेश अंब्रे , प्रशांत पोवळे , प्रमोद पोवळे,
प्रगती कारेकर,पायल कारेकर उपस्थित होते.
यावेळी गणेश पवार, दिनेश अंब्रे, पायल कारेकर यांनी आपले मनपूर्वक व्यक्त करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
