
नागपूर- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पाहिला ‘द केरळ स्टोअरी’ चित्रपट आणि म्हणाले….
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी, ९ मेला नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी स्थानिक मेडीकल चौकातील व्हीआर-मॉलमध्ये जाऊन ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. देशभरात सध्या या चित्रपटाची चर्चा आहे. केरळमध्ये हिंदू मुलींचे धर्मांतर केले जाते. त्यानंतर त्यांचा छळ केला जातो, असे दाखवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी कार्यकर्त्यांसोबत नागपुरात हा चित्रपट आणि म्हणाले की, देशातील विदारक सत्य या चित्रपटाच्या माध्यमातून समोर आणले जात आहे. कशा प्रकारे समाजाला त्रास दिला जातोय आणि महिलांवर अन्याय होतोय. हे या चित्रपटात दाखवले आहे. लोक जागृत होत असून हा सिनेमा नसून जागृतीची मोहीम असल्याचे फडणवीस म्हणाले. देशातील अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त असला तरी तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये ‘द केरळ स्टोअरी’च्या प्रदर्शनावर बंदी लावली आहे. या चित्रपटाने गेल्या पाच दिवसांमध्ये ३५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.
दरम्यान, ‘द केरळ स्टोअरी’ या चित्रपटाच्या दिग्दर्शकाला फाशी दिली पाहिजे, असे आक्षेपार्ह विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. त्यावर फडणवीसांनी म्हणाले की, जितेंद्र आव्हाड यांच्या वाईट विचारांनाच फाशी देणे आवश्यक आहे.
