संंगमेश्वर- संगमेश्वर तालुक्यातील रातांबी गावाला गडनदी मुळे दरवर्षी पुराचा धोका निर्माण होवून नदीचे पाणी गावात शिरुन गावाचे नुकसान होते येथील पूराचा धोका टाळण्यासाठी या ठिकाणी पूरसंरक्षण भींत बांधणे गरजेचे असून यासाठी चिपळूण -संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी पुढाकार घेतला असून पूरसंरक्षण भींत मंजूर व्हावी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पूरसंरक्षण भींत मंजूर करण्याची मागणी केली आहे.
रातांबी गावात गडनदीच्या पूराचे पाणी शिरुन शेतीचे नुकसान झाल्याचे प्रकार घडले आहेत. तर येथील पूरस्थितीची पाहणी करण्यासाठी जसलंपदा विभागाचे कोकण प्रदेश तत्कालीन मुख्य अभियंता विजय घोगरे राजिवली ग्रामपंचायत माजी उपसरपंच संतोष येडगे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्तांसमवेत १५ फेब्रुवारी २०२२ रोजी पाहणी करुन पूरसंरक्षण भींत बांधणे गरजेची असल्याचे मत मांडले होते. या भींतीचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश दिले होते मात्र काही तांत्रिक कारणात हा प्रस्ताव रखडल्याने येथील पूरसंरक्षण भींतीचे काम रखडले होते आता आमदार शेखर निकम यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मुख्य अभियंता मिलिंद नाईक यांना पत्र लिहून या प्रकरणी पुढाकार घेतल्याने स्थानकिांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
रातांबी गावाचे पुनर्वसन प्रस्तावीत होते मात्र स्थानिक त्रुटी निर्माण झाल्याने पुनर्वस रद्द करुन त्या ठिकाणी जसलंपदा विभागामार्फत सुविधा पुरवण्याचे मान्य करण्यात आले होते त्याप्रमाणे त्या ठिकाणी पूरसंरक्षण भींत बांधली असून ती भींत पूरेशी नसून त्या भींतीवरुन पाणी गावात शिरुन गावाचे नुकसान होते त्यामुळे नव्याने पूरसंरक्षण भींत मंजूर करण्याची मागणी स्थानिकांची आहे. स्थानिकांची मागणी लक्षात घेवून माजी उपसरपंच संतोष येडगे यांनी आमदार शेखर निकम यांची भेट घेवून ही बाब लक्षात आणून दिली आहे या कामासाठी आमदार शेखर निकम सकारात्मक असून या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे आमदार शेखर निकम यांनी यावेळी सांगितले आहे.