
रत्नागिरी, दि. 26 (जिमाका) : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 27 एप्रिल रोजी सकाळी 9.40 वाजता सह्याद्री शिक्षण संस्था ग्राऊंड हेलिपॅड, सावर्डे,ता. चिपळूण येथे आगमन. सकाळी 9.45 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रवेश आयोजित कोकण महाराष्ट्र – महाराष्ट्र गौरव रथयात्रा शुभारंभ. नंतर मोटारीने प्रयाण. सकाळी 10.30 वाजता कसबा, ता. संगमेश्वर येथे आगमन. सकाळी 10.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन, छत्रपती संभाजी महाराज स्मारकाच्या जागेची पाहणी, प्राचीन पुरातन मंदिराची पाहणी. सकाळी 11.30 वाजता छत्रपती संभाजी महाराज स्मारकासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गासोबत आढावा. नंतर संगम स्थळाची पाहणी. दुपारी 1 वाजता सह्याद्री पॉलिटेक्निक, सावर्डे, ता. चिपळूण येथे आगमन व राखीव. दुपारी 2 वाजता सह्याद्री स्कूल ऑफ आर्टला सदिच्छा भेट. दुपारी 2.30 वाजता कार्यकर्ता मेळावा. नंतर मोटारीने प्रयाण. सायंकाळी 4.25 वाजता सह्याद्री शिक्षण संस्था ग्राऊंड हेलिपॅड, सावर्डे, चिपळूण येथे आगमन. सायंकाळी 4.30 वाजता हेलिकॉप्टरने प्रयाण.
“संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारणार”, अजित पवार यांनी केली होती घोषणा
अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक संगमेश्वर येथे उभारण्याची घोषणा केली होती त्या अनुषंगाने आमदार शेखर निकम यांनी पाठपुरावा केला आहे त्याच अनुषंगाने अजित पवार यांचा दौरा असून मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. अजित पवार सांगितले होते की “छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या रक्षण आणि विस्तारासाठी जीवन समर्पित केलेल्या, असीम शौर्य आणि धैर्याने लढलेल्या, सर्व लढायांत विजयश्री मिळवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या खुणा महाराष्ट्रात जिथे आहेत, त्यात कोकणातील संगमेश्वर हे एक प्रमुख ठिकाण आहे. औरंगजेबाच्या महाकाय सेनेशी महाराजांनी बोटावर मोजता येतील एवढ्या शूर मावळ्यांना सोबत घेऊन येथेच पराक्रमाची शर्थ केली. स्वराज्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या स्वाभिमानी राजाच्या पराक्रमाची स्मृती कायमस्वरुपी जपण्यासाठी संगमेश्वर येथे त्यांचे भव्य स्मारक उभारण्याची मी घोषणा मी करतो.” याच अनुषंगाने दौरा असल्याचे बोलले जात आहे.