श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान

Spread the love

बुलढाणा – विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांची पालखी आज सकाळी पंढरपूरसाठी रवाना झाली आहे.एक अश्व, ५०० पताकाधारी वारकरी या पालखीमध्ये सहभागी झाले असून, पायदळ वारीचे हे ५४ वे वर्ष आहे. गण गण गणात बोते आणि हरिनामाचा गजर करत अतिशय भक्तिमय वातावरणात ही पालखी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.

आपण या पालखी सोहळ्याची वाटचाल कशी असेल यावर देखील एक नजर टाकूयात..

पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी हजारो भाविक वारकरी कालपासूनच शेगावात दाखल झाले होते.सकाळी मंदिरात श्रींच्या रजत मुखवट्याची पूजा पार पडल्यानंतर ही पालखी मार्गस्थ झाली. नागझरी रोडवरील युवराज देशमुख यांच्या मळ्यात चहापाण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ‘श्रीं’ची पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. आज पालखी नागझरी मार्गे जाणार असून पालखीचा आजचा मुक्काम पारस येथे राहणार आहे. त्यानंतर निमकर्दा, गायगाव, भोरद मार्गे पालखी अकोला शहरात दाखल होणार आहे. अकोला येथे पालखीचा २ दिवस मुक्काम असून तिथून पुढे वाडेगांव मार्गे पं ढरपूरकडे जाणार आहे.

२७ जून रोजी पालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे पोहचणार असून तिथे २७ जून ते २ जुलै पर्यंत पालखीचा मुक्काम राहणार आहे. तर ३ जुलै रोजी परतीच्या मार्गावर श्रींची पालखी निघणार आहे. २३ जुलै रोजी खामगाव मुक्कामी राहिल्यानंतर २४ जुलै रोजी सोमवारी श्रीची पालखी माहेरी म्हणजेच शेगावी पोहोचणार आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page