अपघातामुळे भयभीत झालेल्या कला क्रीडा शिक्षकांची उर्वरित प्रशिक्षण रत्नागिरीतच घेण्याची निवेदनाद्वारे मागणी…

Spread the love

गौरव पोंक्षे /संगमेश्वर- रत्नागिरी येथे सध्या वरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण सुरू आहे.आज प्रशिक्षणाचा सहावा दिवस असून,चिपळूण हुन रत्नागिरी ला प्रशिक्षणा साठी निघालेल्या २७ शिक्षकांच्या खाजगी बसला भीषण अपघात झाला.या अपघातात जीवित हानी झाली नसली तरी अनेकांना गंभीर इजा झाली आहे.या अपघातामुळे सगळेच सहकारी शिक्षक धास्तावले आहेत.

या प्रशिक्षणात कला क्रीडा विभागातील समाविष्ठ असलेले ११ शिक्षकांना १० दिवसाच्या प्रशिक्षणापैकी ७ दिवस प्रशिक्षण हे रत्नागिरीत करून सातव्या दिवशी सायंकाळी ५.३० सुटल्यावर पुढील ३ दिवसासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील पेठवडगाव जवळ मिणचे हेथे होणार आहे.त्यासाठी ९ रोजी सायंकाळी ५.३० वाजता सुटल्यावर १० रोजी सकाळी ९ च्या आत मिणचे येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सहकाऱ्यांचा झालेला अपघात,रक्तबंबाळ स्थितीत पाहिलेली दृश्य,थरकाप उडवणारी अपघाताची छायाचित्र पाहून शिक्षकांची व शिक्षकांच्या कुटुंबियांची मानसिकता बिघडली आहे.या संपूर्ण प्रशिक्षणात वेळेचे अवाजवी,अनावश्यक बंधन असल्याने प्रवासात,गाडी चालवताना शिक्षकांचे फक्त घड्याळाकडे लक्ष राहत आहे.

या पार्श्वभूमीवर कला क्रीडा शिक्षकांनी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुशीलकुमार शिवलकर,राहुल बर्वे यांना व कोकण पदवीधार आमदार निरंजन डावखरे,शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवेदन देण्यात आले आहे.

संबंधित व्यवस्थेबद्दल बदल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आमदार निरंजन डावखरे,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी सांगितले आहे.

निवेदनात म्हटले आहे कीं, वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण

फाटक हायस्कुल वरिष्ठ वेतन श्रेणीचे फाटक हायस्कूल रत्नागिरी येथे होत असलेले प्रशिक्षण कला-किडा शिक्षकांसाठी सात दिवस रलागिरी येथे असून उर्वरीत तीन दिवस कोल्हापूर येथे विभाग स्तरावर देण्यात येणार आहे. आज बावनदी येथे प्रशिक्षणासाठी येणाऱ्या शिक्षकांच्या बसला भिषण अपघात होवून सहा शिक्षक गंभीर जखमी झाले आहेत. यामुळे आता विभाग स्तरावर प्रशिक्ष‌णाला जाण्यासाठी जो रात्री अपरात्री भर पावसात, धोकादायक रस्त्यांवरून आणि घाट रस्त्यातील दाट धुक्यातून प्रवास करण्याची आमची मानसिकता राहीली नाही.असे नमूद करण्यात आले आहे. या भिषण अप‌घातामुळे आम्ही सर्व प्रशिक्षणार्थी कमालीचे घाबरलो असून आमच्या घरातील कुटुंबीय देखील अस्वस्थ झाले आहेत.
वरील गंभीर प्रसंगामुळे आमची कला किडा प्रशिक्षणार्थीची आपल्याला नम्र विनंती आहे की, आमचे उर्वरित तीव दिवसांचे प्रशिक्षण फाटक हायस्कूल, रत्नागिरी येथेच संपन्न व्हावे. आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कला क्रिडा प्रशिक्षणाची पुस्तिका तयार करणारे रत्नागिरी पटवर्धन हायस्कूलचे कला शिक्षक आणि उप मुख्याध्यापक रुपेश पंगेरकर तसेच रत्नागिरी जिल्हा कलाध्यापक संघटनेचे अध्यक्ष ईमतियाज शेख यांची नियुक्ती करावी, हे शक्य नसल्यास सावर्डे ता. चिपळूण येसील आर्ट कॉलेज मधील एका प्राध्यापकाची नियुक्ती करावी आणि आम्हाला मार्गदर्शन मिळावे ही विनंती, सध्या सर्वांच्याच मनात निर्माण झालेली स्थिती पहाता रत्नागिरी जिल्ल्यासाठी खास बाब म्हणून उर्वरित तीन दिवसांचे प्रशिक्षण फाटक हायस्कूल, रलागिरी येथेच संपन्न व्हावे, ही कळकळीची आणि आग्रही विनंती आहे .

याबाबत आपण संचालकांना सूचना द्याव्यात अशी विनंती करण्यात आली आहे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page