
*देवरूख-* देवरूख सह्याद्रीनगर येथील सेवानिवृत्त पोस्ट मास्तर दिपक हळबे यांचे गुरूवारी दुपारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. निधनासमयी ते ५९ वर्षांचे होते.
गुरूवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामे आटपून ते घरात असतानाच दुपारी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने जवळच असलेल्या चोडणकर हाँस्पिटलला दाखल करण्यात आले. मात्र डाँक्टरांनी तपासणी केली असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. मितभाषी व शांत स्वभावाचे असलेले हळबे हे अनिरुद्ध बापू यांचे निस्सीम भक्त होते. ते विविध क्षेत्रात काम करत असत. ते संगमेश्वर तालुका तायक्वांदो ॲकँडमीचे खजिनदार होते. त्यांच्या निधनाची बातमी समजताच अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेवून अंत्यदर्शन घेतले. त्यांच्यावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. त्यांच्या पश्चात पत्नी व एक मुलगा असा परिवार आहे.