नवी दिल्ली , 25 जुलै
ओबीसी आरक्षण आणि महापालिका निवडणुकांबाबत आज मंगळवार (दि. २५ जुलै) रोजी सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या कामकाजात संबंधित प्रकरण समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि ओबीसी आरक्षणाचा आज निर्णय लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल आहे. यासंदर्भात अद्याप ठोस निर्णय लागलेला नाही. त्यामुळे राज्यातील महापालिका निवडणुका कधी लागतील, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष आहे.