मुंबई(अजित गोरुले/शांताराम गुडेकर )
महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या राजकीय पक्ष बळीराज सेना याची आज पक्ष अध्यक्ष तरूण तडफदार आक्रमक नेतृत्व श्री.अशोक वालम साहेब यांच्या अध्यक्षतेखालील संघाध्यक्ष भूषण बरे साहेब व संघ पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.९ जुलै २०२३ रोजी गावस्कर हाॅल, दादर पूर्व, मुंबई येथे हजारो कार्यकर्त्यां समोर जंबो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये उपनेते पदी आणि दापोली-मंडणगड -खेड :- विधानसभा – संपर्कप्रमुख पदी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यामधील पंदेरी गावातील पाटीलवाडी गावचे सुपुत्र, कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका मंडणगडचे – सरचिटणीस, दि ग्लोबल चारीटेबल फॉउंडेशन चे अध्यक्ष, कोकण भूमिपुत्र अँड. चंद्रकांत कोबनाक साहेब यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांवर जबाबदारी देऊन संपूर्ण महाराष्ट्रात व कोकणात, मुंबईसह उपनगर आगामी महानगर पालिका, जिल्ह्य परिषद, लोकसभा, विधान सभा निवडणूकी करीता संघटन मजबूत करून सज्ज होण्यास आवाहन करण्यात आले आहे. त्यांच्या या नियुक्ती बद्दल कोकणातील अनेक सामाजिक संघटना, समाज – शाखा, मंडळ, राजकीय मित्र मंडळी, इतर बहुजन समाजातील मान्यवर, मित्र परिवार यांनी अँड. कोबनाक साहेब यांना अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या आहेत.