▪️मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनद्वारे एका अज्ञात व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. याबाबत पोलिसांनी तातडीने चौकशी केल्याने तो फोन पुण्यातील वारजे या भागातून आल्याचे समोर आला.
त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत धमकी देणाऱ्या तरुणाला अटक केली आहे. आरोपी हा दारूच्या नशेत होता. त्याने आधी रुग्णवाहिकेसाठी फोन केला होता, असे सांगण्यात आले आहे.