
परभणी | परभणी तालुक्यातील मुरुंबा गाव आणि नारायण चाळ परिसरात अज्ञात आजारांमुळे शेकडो पक्षी मृत्युमुखी पडले. दरम्यान गावात सर्वेक्षणाचे काम पूर्ण होईपर्यंत जिल्हा दंडाधिकारी दीपक मुगळीकर यांनी मुरुंबा (ता. परभणी) येथे खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व मेळावे, प्रदर्शने आणि पशुधनाची वाहतूक करण्यास बंदी घातली आहे.
त्यांनी सायंकाळी हा आदेश जारी केला. पशुसंवर्धन विभागाचे पथक मुरुंबा येथे तैनात असून, मृत पक्ष्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. मात्र, मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सर्वत्र बर्ड फ्लूचा धोका वाढला आहे. हा आजार एव्हियन इन्फ्लूएंझा विषाणूमुळे होतो.
बर्ड फ्लूचा धोका वाढत असल्याने गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. मुरुंबा गावात आतापर्यंत शेकडो कोंबड्या व इतर पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाचे पथक तैनात आहे. प्रत्यक्षात प्रकार काय आहे, याची तपासणी यंत्रणा करत आहे. त्यासाठी नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. डॉ.अशोक लोणे, तहसील पशुसंवर्धन अधिकारी के.बी.तांबे, डॉ.गिरीश लाटकर याची पडताळणी करत आहेत. त्यांनी गावाला भेट देऊन पक्षी मृतावस्थेत आढळून आल्यास तत्काळ पशुसंवर्धन विभागाला माहिती देण्याचे आवाहन केले.