ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
▪️मेष :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आज आपण एखाद्या अडचणीत सापडू शकता. नोकरीत इतरांशी प्रेमानं वागून कार्य पूर्ण करून घ्या. वाद संभवतात. नशिबाची साथ मिळणार नाही. कामात त्वरित यश मिळणार नाही. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल. वैवाहिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. पदोन्नती संभवते. काही नियोजित आर्थिक लाभ होतील.
▪️वृषभ :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आज आपण हळवे व्हाल आणि त्यामुळं आपणास बेचैनी जाणवेल. शारीरिक स्वास्थ्यावर सुद्धा त्याचा नकारात्मक परिणाम होईल. नवे कार्य आज सुरू करू नका. उक्ती आणि कृतीवर नियंत्रण ठेवा. खाण्या-पिण्याकडं लक्ष द्या. व्यवसायात विघ्ने येतील. नोकरीत वरिष्ठांशी संघर्ष होण्याची शक्यता आहे. तसेच प्रतिस्पर्ध्यांशी सुद्धा वाद संभवतात. कामात विलंबानं यशप्राप्ती होईल, तेव्हा धैर्यानं वागावं लागेल.
▪️मिथुन :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. आज आपली मनःस्थिती मनोरंजनात्मक कार्यात सहभागी होण्याची असल्यानं मित्रांसह एखाद्या सहलीस जाऊ शकाल. रुचकर भोजन आणि उंची वस्त्रालंकार लाभतील. दुपारनंतर आपण जास्त हळवे व्हाल आणि त्यामुळं मनातील दुःख वाढेल. आर्थिक खर्चात वाढ होईल. अवैध कार्यापासून दूर राहा. मनाला शांती मिळू शकेल अशा एखाद्या प्रवृत्तीत सहभागी व्हा.
▪️कर्क :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. मित्रांसह सहल आणि स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेण्याची संधी प्राप्त होईल. व्यापार-व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
▪️सिंह :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. साहित्य आणि कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळं अस्वस्थता जाणवेल. दुपारनंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार-व्यवसायात लाभ होतील.
▪️कन्या :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. अपघाताची शक्यता असल्याने जलाशया पासून दूर राहावं. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य आणि अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्यानं बौद्धिक चर्चेपासून दूर राहणं हितावह होईल.
▪️तूळ :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते.
▪️वृश्चिक :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळं कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.
▪️धनू :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नियोजित कामे पूर्ण होऊन धनप्राप्ती होईल. शारीरिक आणि मानसिक दृष्टया उत्साहित व ताजेतवाने राहाल. प्रत्येक काम उत्साहानं कराल. प्रवास संभवतो. दुपारनंतर मात्र द्विधा मनःस्थिती होईल. घरात व कामाच्या ठिकाणी कामाचा व्याप वाढेल. वायफळ खर्च होतील.
▪️मकर :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. आज आपल्या बोलण्या वागण्यानं भांडण होण्याची शक्यता असल्याने त्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. संतापाचे प्रमाण वाढेल. मन चिंतीत राहील. मनःशांती मिळविण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर स्फूर्ती आणि उत्साह वाढेल. घरातील वातावरण शांत आणि आनंददायी होईल. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होऊ शकाल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल.
▪️कुंभ :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आजचा दिवस सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. सामाजिक क्षेत्रात आपण सक्रीय राहाल व त्याच्या फल स्वरूप आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकल्यानं त्यांच्या आनंदात भर पडेल. दुपारनंतर मात्र घरातील वातावरण कलुषित होईल. शरीर स्वास्थ्य बिघडेल. आपला संताप संयमित ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल.
▪️मीन :
चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आजचा दिवस आपणास सर्व दृष्टींनी लाभदायी आहे. हातून परोपकारी कार्य घडेल. व्यापारात सुयोग्य नियोजनामुळं व्यापार वृद्धी करू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाचं कौतुक करतील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. वडील आणि वडीलधार्यांचे आशीर्वाद मिळून त्यांच्याकडून लाभ होईल. उत्पन्नात वाढ होईल.
हेही वाचा –