दिनांक 29 फेब्रुवारी 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळेल नशिबाची साथ; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 29 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ…

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणाला सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रांत प्रसिद्धी मिळेल. कौटुंबिक आणि दांपत्य जीवनात सुख – समाधान मिळेल. प्रणयाची पराकाष्ठा होईल. मौज-मस्ती आणि मनोरंजनामुळं सहजीवनात लाभ होईल. जोडीदाराशी सुसंवाद साधू शकाल.

▪️वृषभ :

आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उक्ती आणि कृती यावर संयम ठेवावा लागेल. कोणाची चेष्टा – गंमत करण्याच्या नादात भांडणाची स्थिती उदभवेल. गैरसमज निर्माण होतील. मौज-मजा, करमणूक यावर खर्च होईल. प्रकृतीकडे लक्ष द्यावं लागेल. एखादी दुर्घटना संभवते. मानसिक उन्मत्तपणा अधिक समस्या निर्माण करील. त्यावर ताबा ठेवावा लागेल.

▪️मिथुन :

आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कामाच्या आरंभाला अनुकूल नाही. जीवनसाथी व संतती याच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. चर्चा किंवा वाद-विवाद यात मानहानी होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. स्त्री मित्रांसाठी पैसा खर्च होईल. शारीरिक आणि मानसिक अस्वस्थतेमुळं उत्साहात कमतरता जाणवेल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी सर्वसाधारणपणे चांगला आहे.

▪️कर्क :

आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणं किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळं एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.

▪️सिंह :

आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज आपण शरीरात चैतन्य व मनाची प्रसन्नता अनुभवाल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजन यांच्यासह लहानशी सहल कराल. आर्थिक फायदा होईल. प्रिय व्यक्तीचा सहवास मन आनंदीत करेल. नशिबाची साथ मिळेल. आजचा दिवस नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकूल आहे. आज संगीतात विशेष रूची राहील.

▪️कन्या :

आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. कौटुंबिक सुख – शांती आणि आनंद यामुळं आजचा दिवस आनंदात जाईल. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतर लोकांना प्रभावीत करेल. प्रवासाची शक्यता आहे. मिष्टान्नासह आज आवडीचे भोजन मिळेल. आयात – निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल. परंतु वाद-विवाद टाळा.

▪️तूळ :

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपल्यातील रचनात्मक शक्ती प्रकट होईल. सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता असेल आणि त्यामुळं कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज – मजेची साधने आणि मनोरंजन यासाठी पैसे खर्च होतील. आत्मविश्वास वाढेल. जीवनसाथी किंवा प्रिय व्यक्तीचा सहवास रोमांचक आणि आनंददायी असेल.

▪️वृश्चिक :

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला पैसा आणि वेळ हौसमौज आणि मनोरंजन यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे – सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट – कचेरीच्या कामात सावध राहावं लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.

▪️धनू :

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आर्थिक लाभ आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ आणि व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती याच्याकडून लाभ संभवतो.

▪️मकर :

आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यवसायात धन, मान आणि प्रतिष्ठा यात वाढ होईल. व्यापारासाठी धावपळ आणि वसुलीसाठी प्रवास यातून फायदा संभवतो. वरिष्ठ आपल्यावर खूश असल्याने पदोन्नती संभवते. सरकार, मित्र किंवा संबंधितांकडून फायदा होईल. कौटुंबिक जीवन आनंदी असेल. संततीची प्रगती पाहून आनंदित व्हाल.

▪️कुंभ :

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावं लागेल. मौज- मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.

▪️मीन :

आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कामापासून दूर राहावं. क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यांपासून दूर राहावं. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवेल. कुटुंबियांशी असणार्‍या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका. आपणास योग्य दिशा सापडण्यासाठी प्रयत्न करा.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page