दिनांक 21 जून 2024 जाणून घेऊया आजच्या राशिभविष्य मधून ‘या’ राशीच्या व्यावसायत होणार बढती? वाचा राशी भविष्य…

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

*▪️मेष (ARIES) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टमात भावात असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. सरकार विरोधी कृत्यांपासून शक्यतो दूर राहा. एखादा अपघात संभवतो. बाहेरचे खाण्या-पिण्याच्या सवयींमुळं स्वास्थ्य बिघडेल. कामे वेळेवर पूर्ण होणार नाहीत. व्यवसायात त्रास संभवतो. नोकरीत वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल. संततीशी मतभेद संभवतात. आज शक्यतो महत्वाचे निर्णय न घेणं हितावह राहील.

*▪️वृषभ (TAURUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातवा भावात असेल. मित्र व स्वकीयांसह हिंडण्या-फिरण्यामुळं आनंद मिळेल. सुंदर वस्त्राभूषणे व स्वादिष्ठ भोजनाची संधी मिळेल. दुपारनंतर मात्र प्रकृतीस काही त्रास संभवतो. खर्चात वाढ होईल.

*▪️मिथुन (GEMINI) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहावा भावात असेल. आज कौटुंबिक वातावरण उल्हासमय राहील. शारीरिक स्फूर्ती व मानसिक प्रसन्नता लाभेल. अपूर्ण कामे पूर्णत्वास गेल्यानं आनंदात वाढ होईल. व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. आर्थिक लाभ संभवतात. दुपारनंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी व्हाल. स्वकीय व मित्रांसह हिंडण्या-फिरण्याची व प्रेक्षणीय स्थळी जाण्याची संधी मिळेल. समाजात मान-सन्मान प्राप्त झाल्यानं मन आनंदित होईल.

*▪️कर्क (CANCER) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचवा भावात असेल. आजचा दिवस भविष्यासाठी आर्थिक नियोजन करण्यास अनुकूल आहे. एकाग्रतेने काम केल्यामुळं कामात यश जरूर मिळेल. वाद होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आजचा दिवस अनुकूल आहे. कुटुंबात शांतता नांदेल. शारीरिक व मानसिकदृष्टया उत्साह व प्रसन्नतेचा अनुभव येईल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यवसायात सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.

*▪️सिंह (LEO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चवथा भावात असेल. आज शारीरिक व मानसिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईच्या प्रकृतीची चिंता राहील. आर्थिक हानी होऊ शकते. तरीही दुपारनंतर आर्थिक योजनांवर विचार कराल. परिश्रमानुरूप फळ मिळेल. विद्यार्थ्यांना यश प्राप्ती होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं बौद्धिक चर्चा टाळणं हितावह राहील. नवे कार्य हाती घेण्यात अडचणी येतील. सट्टा- जुगारात नुकसान संभवते.

*▪️कन्या (VIRGO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसरा भावात असेल. आज आपण गूढ विद्येकडं आकर्षित व्हाल. आर्थिक लाभ संभवतात. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करायला अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. विरोधकांवर मात करू शकाल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होईल. मानसिक व शारीरिकदृष्टया अस्वस्थता जाणवेल. आईची तब्बेत बिघडेल. शक्यतो आज स्थावर संपत्तीचे व्यवहार करणे टाळावे.

*▪️तूळ (LIBRA) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसरा भावात असेल. आज सकाळच्या प्रहरी प्रकृतीत बिघाड होण्याची शक्यता आहे. मानसिक थकवा जाणवेल. कुटुंबियांशी प्रेमाने वागावे लागेल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होण्याची शक्यता आहे. दुपारनंतर प्रसन्नतेचा अनुभव घ्याल. आर्थिक लाभ होईल. नशिबाची साथ मिळेल. कार्यात यश प्राप्ती होईल. एखादा प्रवास संभवतो. सहकार्यांशी संबंध चांगले राहतील.

*▪️वृश्चिक (SCORPIO) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज शारीरिक तथा मानसिक स्वास्थ्य चांगले राहील. घरात आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. संताप होऊ देऊ नका. स्नेहीजनांच्या सहवासाचा आनंद घ्या. दुपारनंतर नकारात्मक विचार आपणाला त्रास देतील. आपल्या बोलण्यानं किंवा कृतीनं कुटुंबीय दुखावतील व त्यामुळं कटुता निर्माण होईल. आज एखाद्या धार्मिक कार्यावर खर्च होईल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील.

*▪️धनू (SAGITTARIUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बारावा भावात असेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याच्या शक्यतेमुळं आज आपली वाणी व संताप ह्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य राहील. आज शक्यतो शस्त्रक्रिये सारख्या बाबी टाळणे हितावह राहील. दुपारनंतर कामे यशस्वी होतील. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपणाला लाभ होईल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील.

*▪️मकर (CAPRICORN) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात भावात असेल. आज सामाजिक प्रसिद्धी मिळाल्याने व्यावसायिक व आर्थिक दृष्टया काही लाभ होतील. दुपारनंतर सावध राहावे लागेल. प्रकृतीकडं लक्ष द्यावं लागेल. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन जपून चालवावे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. मनोरंजनासाठी खर्च होईल. संबंधितांशी मतभेद होणार नाही याची दक्षता घ्यावी लागेल. कोर्ट- कचेरीची कामे जपून करावीत.

*▪️कुंभ (AQUARIUS) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशमात भावात असेल. आज आपला मान-सन्मान झाल्याने काही धनलाभ होईल. प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. मित्रांसह सहलीला जाण्याचा बेत आखाल. व्यवसायात लाभ होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

*▪️मीन (PISCES) :* चंद्र आज वृश्चिक राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात भावात असेल. आजची सकाळची वेळ व्यावसायिक व व्यापाऱ्यांसाठी प्रतिकूल आहे. नोकरीत वरिष्ठ व प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी निष्कारण वाद होण्याची शक्यता आहे. प्रवास संभवतात. दुपारनंतर कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल बनेल. अपूर्ण कामे तडीस जातील. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. संततीच्या प्रगतीमुळं समाधान वाटेल. प्रकृती उत्तम राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page