दिनांक एक जून 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी मिळेल ‘या’ राशीला कामात यश; वाचा राशी भविष्य….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलाचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो, तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगलं राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा स्थानी आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. आपली सर्व कामे सहजपणे पूर्ण होतील. त्यामुळं आपला उत्साह वाढेल. एखादा आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबियांसह आनंदात वेळ जाईल. आईच्या घराण्याकडून फायदा होईल. मित्र, स्नेही, सोबती भेटल्यानं घरातील वातावरण आनंदी राहील.

▪️वृषभ :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. आपले मन वेगवेगळ्या चिंतांनी ग्रस्त असेल. स्वास्थ्य बिघडेल किंवा डोळ्याचे विकार संभवतात. कुटुंबीय किंवा आप्तजन यांचा विरोध राहील. आज सुरू केलेली सर्व कामे अपूर्ण राहतील. वायफळ खर्च होईल. एखादा अपघात संभवतो. खूप परिश्रम करून सुद्धा आज अपेक्षित फलप्राप्ती होणार नाही.

▪️मिथुन :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. अविवाहितांना योग्य जोडीदार मिळू शकेल. प्राप्तीत वाढ होईल. मित्रांच्या भेटीतून आनंद मिळेल आणि फायदा सुद्धा होईल. संततीकडून लाभ होऊ शकतो. उत्तम भोजन मिळेल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. नोकरी-व्यवसायात प्राप्ती वाढेल.

▪️कर्क :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज नशिबाची साथ लाभेल. परदेशातून शुभ समाचार मिळतील. एखाद्या छोटया प्रवासामुळं प्रसन्नता वाढेल. शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहील. मन प्रसन्न राहील. मित्र आणि कुटुंबीय ह्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. व्यापार-व्यवसायात फायदा होईल. अचानक धनलाभ संभवतो. परदेशगमन आणि मंगल कार्य ह्यात सफलता मिळेल.

▪️सिंह :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपल्या प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. आजारपणामुळं दवाखान्याचा खर्च वाढेल. राग आणि बोलणे ह्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कुटुंबियांशी मतभेद होतील. बाहेरच्या खाण्या-पिण्यामुळं प्रकृती बिघडेल. आपल्या मनात नकारात्मक विचार येतील. अवैध कामात कोठेही सहभागी न होण्याविषयी दक्ष राहा. मनाला दिलासा मिळण्यासाठी प्रयत्न करावेत.

▪️कन्या :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज नवीन कामाची सुरूवात न करणं हितावह राहील. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. बाहेरचं खाणं-पिणं टाळावं लागेल. आज आपला स्वभाव चिडचिडा झाल्यानं बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. खूप खर्च होईल. पाण्यापासून जपून राहावं लागेल. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे ह्यापासून शक्य तितके दूर राहावे.

▪️तूळ :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी आहे. भिन्नलिंगी व्यक्तीचा तुमच्या जीवनावर पगडा असेल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर, मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान-सन्मान मिळेल. रुचकर भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आरोग्यविषयक थोडी तक्रार राहील. संततीची समस्या काळजीत टाकील. मानहानीची शक्यता आहे. शेअर-सट्टा यात न पडणे हिताचे राहील. शक्यतो प्रवासात जपून राहा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. आर्थिक नियोजन यशस्वीरीत्या पूर्ण कराल.

▪️धनू :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आज शरीर आणि मनात उत्साहाचा अभाव राहील. मनावर चिंतेचे ओझे राहील. कौटुंबिक वातावरण कलुषित राहील. आईशी मतभेद होईल किंवा तिच्या प्रकृती संबंधी चिंता राहील. सार्वजनिकदृष्टया आपला मानभंग होऊ नये याकडं लक्ष द्या. वेळेवर जेवण व झोप न मिळाल्यामुळं स्वभाव चिडचिडा होईल. महत्वाची खरेदीपत्रे करू नका.

▪️मकर :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज दैनंदिन कामात अनुकूलता लाभल्यानं दिलासा मिळेल. कौटुंबिक जीवनातील अडचणी दूर होत असल्याचा प्रत्यय येईल. संपत्तीविषयक कामांचा निर्णय होईल. व्यापार-व्यवसायात आर्थिक लाभ होईल. भावंडांचे सहकार्य लाभेल. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नवीन काम हाती घेण्यास दिवस अनुकूल आहे.

▪️कुंभ :

आज चंद्र मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा स्थानी आहे. वाणीवर ताबा ठेवाल तर अनेक समस्यांपासून बचाव होईल. वाद-विवाद करताना जास्त खोलात जाऊ नका. अनावश्यक खर्चावर अंकुश ठेवा. कामात अल्प यश मिळेल. समाधानाची भावना अनुभवाल. पण आरोग्य बिघडेल. विद्यार्थ्यांना विद्या प्राप्तीत अडचणी येतील. आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

▪️मीन :

आज चंद्र 01 जून, 2024 शनिवार च्या दिवशी मीन राशीत आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आज आपणास खर्च नियंत्रित ठेवावे लागतील. संताप आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल. आज कोणाशीही मतभेद किंवा गैरसमज होण्याची शक्यता आहे. आज आर्थिक देवाण-घेवाण सावधपणे करावी लागेल. आप्त स्वकीयांशी वाद होतील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचार येतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page