ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.
▪️मेष :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज स्वभावातील तापटपणा आणि हट्टीपणा यावर नियंत्रण ठेवावं लागेल. कष्ट घेऊनही अपेक्षित यश न मिळाल्यानं मन उदास होईल. शारीरिक अशक्तपणा जाणवेल. आजचा दिवस प्रवासासाठी अनुकूल नाही. संतती विषयक काळजी निर्माण होईल. कोणत्याही गोष्टीत विचार केल्या शिवाय पाऊल उचलणं हानिकारक ठरेल. सरकारी कामात यश मिळेल.
▪️वृषभ :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चैथ्या स्थानी असेल. आज आपल्या कार्यातील यशात दृढ मनोबल आणि खंबीर आत्मविश्वास याची भूमिका महत्वाची राहील. वडीलाच्या घराण्याकडून लाभ होईल. विद्यार्थिवर्गाची अभ्यासात गोडी लागेल. सरकारी कामात यश आणि फायदा मिळेल. संततीसाठी पैसा खर्च करावा लागेल. कलाकार, खेळाडू याना आपलं कौशल्य दाखविण्यास अनुकूलता लाभेल. आज शक्यतो संपत्ती विषयक कायदेशीर दस्तऐवज करू नये.
▪️मिथुन :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी उत्साह आणि स्फूर्ती जाणवेल. प्रगतीच्या संधी येतील. झटपट बदलणारे विचार आपणास अडचणीत टाकतील. नवीन कामे सुरू करू शकाल. मित्र, नातेवाईक आणि शेजारी-पाजारी यांच्याशी सलोख्याचे संबंध राहतील. आज आपणाला काही लाभ होण्याची शक्यता आहे.
▪️कर्क :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मनात निराशा असल्यामुळं खिन्नता अनुभवाल. कुटुंबियांशी मतभेद आणि गैरसमज होतील. अहंपणामुळं इतर कोणाच्या भावना दुखवाल. विद्यार्थ्यांचे अभ्यासावर चित्त एकाग्र होणार नाही. धनखर्च वाढेल. असंतोषाच्या भावनेने मन घेरलं जाईल.
▪️सिंह :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आत्मविश्वास व झटपट निर्णय घेऊन कामात आघाडीवर राहाल. समाजात मान – प्रतिष्ठा वाढेल. उक्ती व कृतीतील उग्रपणा व अहंपणा ह्यामुळे संघर्ष होण्याची शक्यता आहे. वडील व वडीलधार्यां कडून लाभ होईल. प्रकृतीची थोडी कुरकुर राहील. वैवाहिक जीवनात माधुर्याचा अनुभव येईल. सरकारी कामे जलद गतीने होतील.
▪️कन्या :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शारीरिक आणि मानसिक चिंता बेचैन करतील. एखाद्याशी मतभिन्नता होण्यास आपला अहंभाव कारणीभूत ठरेल. अचानक धनखर्च होईल. दांपत्य जीवनात कटुता निर्माण होईल. मानसिक आणि शारीरिक अस्वास्थ्य राहील. नोकर वर्गाकडून त्रास संभवतो.
▪️तूळ :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज कौटुंबिक जीवनात सुख आणि आनंद मिळेल. उत्पन्न वाढ संभवते. कामाच्या जागी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील. बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबीय आणि मित्रांच्या सहवासात खुश राहाल. प्रवास आनंददायी होईल. व्यापारी वर्गाला लाभकारक व्यापार होईल. वैवाहिक सुख उत्तम मिळेल.
▪️वृश्चिक :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज आपली सर्व कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. संसारात आनंद आणि समाधान राहील. समाजात मान – प्रतिष्ठा मिळेल. आरोग्य उत्तम राहील. वरिष्ठ आणि वडिलधार्यांची मर्जी राहील. संततीच्या समाधान कारक प्रगतीचा आनंद मिळेल. येणी वसूल होतील.
▪️धनू :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज काही कारणानं आपण अडचणीत सापडाल. कोणतेही काम करण्यात उत्साह वाटणार नाही. शारीरिक आणि मानसिक व्यग्रता राहील. वेळ काळजीत जाईल. नोकरी-व्यवसायात त्रास जाणवेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद-विवाद केल्यानं हानी होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांचा अत्यंत दक्षपणाने सामना कराव लागेल.
▪️मकर :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचारां पासून दूर राहा आणि खाण्या-पिण्याकडं चांगलं लक्ष द्या. अचानक खर्च वाढेल. औषधोपचारावर पैसा खर्च होईल. व्यापारात भागीदारांशी मतभेद वाढतील. क्रोध आणि आवेशावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक कामानिमित्त प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी आपली प्रशासकीय बुद्धिमत्ता दुर्लक्षित होईल.
▪️कुंभ :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. प्रणय, प्रेमालाप, प्रवास, पर्यटन, मनोरंजन हे आजच्या दिवसाचा भाग बनतील. मित्र आणि कुटुंबीयांसह भोजनासाठी बाहेर जाऊ शकाल. उत्तम वस्त्रे, दागिने, वाहन प्राप्ती होण्याची शक्यता आहे. भागीदारांशी चांगले संबंध राहतील. सार्वजनिक जीवनात प्रतिष्ठा आणि नावलौकिक मिळेल. आत्मविश्वासाने कार्यात यश मिळेल.
▪️मीन :
आज चंद्र सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील. घरात सुख शांती नांदेल. स्वभाव तापट राहील. उक्ती आणि कृती यात समतोल साधावा लागेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. सहकार्यांचं सहकार्य मिळेल. आईच्या घराण्याकडून लाभ होईल.