कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ‘ईटीव्ही भारत’वरील या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 15 फेब्रुवारी 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ….
▪️मेष :
आज चंद्र मेष राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने आणि उत्साहाने कराल. मित्र आणि सगे-सोयरे यांच्या येण्या जाण्यानं घरातील वातावरण आनंदाचं राहील. त्यांची अचानक भेट आपणास आनंदित करेल. आज आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. प्रवासाची तयारी ठेवा. नवीन कामे सुरू करू शकाल. उत्तम भोजनाचा लाभ मिळेल.
▪️वृषभ :
आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय घेऊ नका. आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळं मन उदास बनेल. कुटुंबात मतभेद निर्माण झाल्यानं आपलं मन दुःखी होईल. कष्टाचा योग्य मोबदला न मिळाल्यामुळं नाराज व्हाल. दिवस खर्चाचा आहे.
▪️मिथुन :
आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील. समाजात मान आणि प्रतिष्ठा वाढेल. मित्रांकडून फायदाही होईल आणि त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकेल. विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. पत्नी आणि संतती याच्याशी सुसंवाद राहिल्यानं दांपत्य जीवनात गोडवा निर्माण होईल.
▪️कर्क :
आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज गृह सजावटीवर आपण विशेष लक्ष द्याल. घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. व्यापारी आणि नोकरदार लाभाची किंवा बढतीची अपेक्षा करू शकतात. कुटुंबात सुख-शांती नांदेल. सरकारी लाभ मिळतील. आपली प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक लाभ होईल. आज सर्व कामे शांतपणे आणि व्यवस्थितपणे पार पाडू शकाल.
▪️सिंह :
आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आज स्वभावात उग्रता आणि संताप असल्यामुळं काम करण्यात आपलं मन लागणार नाही. वादविवादात आपल्या अहंकारामुळं कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. उतावीळपणामुळं निर्णय घेऊन किंवा वाटचाल करून नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात अडचणी आल्याने नियोजित काम पूर्ण होऊ शकणार नाही. एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल.
▪️कन्या :
आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नाही. बाहेरच्या खाण्यामुळं प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरेल. पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रू पासून सावध राहा. आग आणि पाणी या पासून जपून राहावं. सरकार विरोधातील काम किंवा अवैध प्रवृत्ती यामुळं संकट ओढवेल.
▪️तूळ :
आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन आणि मौज-मस्ती करण्याचा आहे. सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश आणि कीर्ती वाढेल. भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील. वस्त्रे आणि अलंकार यांची खरेदी होईल. उत्तम दांपत्यसुख आणि वाहनसुख मिळेल. प्रकृती आणि मनःस्वास्थ्य उत्तम राहील. मित्रांसह सहलीला जाण्याचा योग आहे.
▪️वृश्चिक :
आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज आपण निश्चिंतपणा आणि सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवाल. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत होईल. अपूर्ण कामे तडीस जातील.
▪️धनू :
आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज आपण संततीचा अभ्यास आणि स्वास्थ्य यामुळं चिंतीत व्हाल. पोटाच्या तक्रारी सतावतील. कामातील अपयशाने आपण निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. साहित्य, लेखन आणि कला या विषयांची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होईल. आज वाद-विवाद किंवा चर्चा यात भाग घेऊ नका.
▪️मकर :
आपल्या राशी पासून चंद्र चौथ्या स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्यानं मन खिन्न होईल. शारीरिक स्फूर्ती, तरतरी याचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा संभव आहे. छातीत दुखणं संभवू शकतो. एखाद्या स्त्रीमुळं अडचणीत येऊ शकता.
▪️कुंभ :
आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण तना – मनाने प्रसन्न व्हाल. मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवाल. त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल. लहान प्रवास होतील. मित्र व स्वजनांच्या सहवासाने आपले मन आनंदीत होईल. आपल्या कार्यक्षेत्रात कौशल्य पूर्वक उत्तम यश मिळवाल.
▪️मीन :
आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल आहे. नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होईल. कुटुंबात सुख शांतीचं वातावरण असेल. उत्कृष्ट भोजन मिळेल. स्वास्थ्य ठीक राहील, तसेच मनाचे स्वास्थ्य सुद्धा आपण चांगले टिकवून ठेवाल.