दापोली-पुणे एस.टी. बसला अपघात , ७ प्रवासी जखमी…

Spread the love

*महाड :*  तालुक्यातील रेवतळे आंग्रे कोंडजवळ जाळीच्या देवाच्या ठिकाणी दापोली-पुणे शिवशाही बस (एमएच.०६. बी.डब्ल्यू. ०५४५) रस्त्यावरून घसरून अपघात झाला. सकाळी ८.३० च्या सुमारास दापोली आगारातून निघालेली बस समोरून येणाऱ्या खासगी कारला वाचवताना चालकाने ब्रेक मारल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात बसमधील ७ प्रवासी जखमी झाले असून, उर्वरित २९ प्रवासी सुदैवाने बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
        

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींमध्ये रियाज हरसिलकर (३२, बुरोंडी), समीक्षा सारंगे (३२, पुणे), निलोफर हरसिलकर (२६, बुरोंड़ी), मनिषा मनोहर महाडिक (हर्णे), नूरजहाँ रियाज हर्सिलकर (५२, दापोली), शैरीश माटवणकर (२२, काजळपुरा महाड) आणि
शमशा माटवणकर (४४, महाड) यांचा समावेश आहे. यापैकी दोन प्रवाशांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले असून, इतरांवर महाड ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. महाड आगाराचे व्यवस्थापक फुलपगारे यांनी उर्वरित प्रवाशांना  एस.टी.च्या दुसऱ्या बसमधून महाडला रवाना केले.

कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकानं मारला ब्रेक

रविवारी दापोली आगारातून सकाळी 8.30 च्या सुमारास एमएच 06 बीडब्ल्यू 0545 ही शिवशाही बस पुण्यासाठी रवाना झाली. बस रेवतळे आंग्रे कोंड या ठिकाणी आली असता समोरून येणाऱ्या कारला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकानं ब्रेक मारला. त्यामुळे गाडी निसरड्या रस्त्यावरून घसरून झाडावर जाऊन आदळली. यानंतर बस रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या गटारामध्ये जाऊन अडकली. बसमधून 31 प्रवासी प्रवास करत होते. मात्र यातील दोन प्रवाशांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाल्यानं त्यांना महाड ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. इतर प्रवाशांना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून महाड आगारातील आगार व्यवस्थापक फुलपगारे यांनी दुसऱ्या एसटी बसमधून महाड इथं या सर्व प्रवाशांना स्थलांतरित केलं आहे. जखमींमध्ये रियाज हर्सिलकर ( वय 32 रा. बोरोंडी), समीक्षा सारंगे ( वय 32 रा. पुणे), निलोफर हरसिलकर ( वय 26 बोरोंडी), मनिषा मनोहर महाडिक ( रा. हर्णे ), नूरजहाँ रियाज हर्सिलकर (वय 52 वर्षे दापोली), शैरीश माटवनकर ( वय 22, काजळपुरा महाड), शमशा माटवनकर ( वय 44 वर्षे, महाड ) यांचा समावेश आहे. जखमींवर महाड इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेली काही दिवस या सुस्थितीतील मात्र तीव्र उतार असलेल्या रस्त्यांवर सातत्यानं अपघात होत असल्यानं हा मार्ग चर्चेत आला आहे. या मार्गावर उपाययोजना करण्यासाठी काही ठिकाणी निसरडा रस्ता असल्यानं रस्ता खरडवण्यात आला आहे. वाहन चालकांनी रस्त्याची स्थिती पाहून वाहन चालवलं पाहिजे, असा सल्ला अधिकाऱ्यांकडून दिला जात आहे.

रस्त्याची योग्य दुरुस्ती झाली नसल्याची नागरिकांची तक्रार

महाड दापोली रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम एप्रिल महिन्यामध्ये करण्यात आलं. या रस्त्यावर केवळ डांबर मारून त्यावर ग्रिट टाकल्यानं या रस्त्याची योग्य दुरुस्ती झाली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. या रस्त्यांवर वारंवार अपघात घडत असून, आजचा हा 16 वा अपघात असल्याचा दावा नागरिकांनी केला. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम उपविभाग महाड यांच्याकडून याबाबतीमध्ये दुर्लक्ष होत असल्यानं संताप व्यक्त केला जात आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page