
मंडगणड (प्रतिनिधी) दि. : येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात सांस्कृतिक विभागाच्या वतीने ‘सांस्कृतिक कार्यक्रम’या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्षक म्हणून सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. हनुमंत सुतार हे उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. विष्णु जायभाये, डॉ. अशोक साळुंखे डॉ. संगीता घाडगे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्रभारी प्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी डॉ. संगीता घाडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमागील उद्देश स्पष्ट केला.
मार्गदर्शक म्हणून बोलताना प्रा. हनुमंत सुतार यांनी सांगितले की, महाविद्यालय, मुंबई विद्यापीठाचा युवा महोत्सव व विविध ठिकाणी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आपण सहभाग घेत असतो. सदर कार्यक्रमामध्ये सहभाग घेण्यापूर्वी आपली तयारी पूर्ण होणे गरजेचे असते. जर आपली तयारी व्यवस्थित नसेल तर आपल्या पदरी निराशा येते. हे टाळायचे असेल तर कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेमध्ये पूर्ण तयारीनिशी उतरणे आवश्यक असते.
अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. वाल्मिक परहर यांनी सांगितले की, महाविद्यालय नेहमीच विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी संधी उपलब्ध करुन देते. परंतु दिलेल्या संधीचे सोने करण्याची आपल्या सर्वांनी तयारी असणे गरजेचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमास सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. प्रा. संगीता घाडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
………………..
फोटो ओळी:- M-11 विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करताना प्रा. हनुमंत सुतार, सोबत प्रभारी प्राचार्य
डॉ.वाल्मिक परहर, उपप्राचार्य डॉ. विष्णू जायभाये व इतर
मंडणगाड प्रतिनिधी