दीपावली निमित्ताने वाचन संस्कृतीची  जोपासना..

Spread the love

संगमेश्वर : दिनेश आंब्रे- सध्या इंटरनेट व मोबाईलचा जमाना आहे. काही ठिकाणी विविध विषयांवरील लेखन आपल्याला मोबाईलवर वाचायला मिळते. दीपावलीचा सण म्हणजे दिव्यांच्या प्रकाशाचा सण, अज्ञानाचा अंधकार आणि ज्ञानाचा प्रकाश म्हणून आपण भारतीय बांधव दीप लावून दीपमाळांनी तसेच घरोघरी आकाश कंदील व फुलांपासूनच्या रांगोळ्या या पासून केलेली सजावट व फटाक्यांच्या आतिषबाजी, विविध प्रकारचे रंगीबेरंगी नवीन कपडे व अत्तरे लावून अशा प्रकारच्या वातावरणात, वनश्रीने फुलवलेल्या फुलांतून नैसर्गिक सुगंध व कृत्रिम सुगंध, फराळ यामधून आपण आपली भारतीय संस्कृती जपतही मनाला हर्षवणारी दिवाळी साजरी करत असतो.


   

या सुट्टीचा आनंद द्विगुणीत करताना सध्या तरुणाई घरोघरी दिवाळी अंकाचे वाचन करताना दिसून येतात. यातूनच मनाला मनोरंजन, भारतीय संस्कृतीच्या विषयी तसेच सौंदर्यशास्त्र, वास्तू शिल्पकला, विविध मंदिरे,शिक्षण, पर्यावरण, व्यवसाय,तंत्रज्ञान,कथा लेख, परिसंवाद,पसायदान, राशिभविष्य, हास्य जत्रा इत्यादी पासूनचे विविध विषयांवरील ज्ञानबुद्धी ग्रहण करते. मनाला अवर्णनीय आनंद मिळतो. लहान थोर मंडळी आपापल्या आवडीप्रमाणे या दिवाळी अंकातील लेखनाचे वाचन करताना, मन रमविताना दिसून येतात. बाल चिमुकले  किल्ले बनवताना दिसून येतात.विविध पुस्तके तसेच सध्या दिवाळी अंकाचे वाचन करताना, तरुणाई भारतीय संस्कृती जपताना दिसत आहे. सध्या घराघरातून वाचन संस्कृतीची जपणूक होत आहे. त्यामुळे हा दिवाळीचा सण मानवास पर्वणी ठरत आहे.



आत्ताच्या पिढीतील मुलांना मोबाईल पासून कसे वाचवायचे आणि कसे संस्कार द्यायचे हा एक मोठा प्रश्नच आहे पण पारंपारिक सणांमुळे मग गणपती असो पाडवा शिमगा असो किंवा दिवाळी असो. आरास करताना, रांगोळी काढताना  ,  विविध किल्ले बनवताना, आकाश कंदील बनवताना, दिवाळी अंकाचे वाचन करताना मुलं दिसतात. त्यामुळे पालकांसमोरचे मुलांना आवरण्याचे मोठे आव्हान सहजपणे पेलण्यासारखे आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page