रत्नागिरीतही गुन्हेगारी वाढू लागली, रत्नागिरीत सापडलेल्या गांजाची १९ वर्षीय तरूणी मुख्य सूत्रधार निष्पन्न झाल्याने खळबळ

Spread the love

रत्नागिरीतही गुन्हेगारी वाढू लागली, रत्नागिरीत सापडलेल्या गांजाची १९ वर्षीय तरूणी मुख्य सूत्रधार निष्पन्न झाल्याने खळबळ


रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील शांतीनगर येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या गांजा पुरवठा करणार्‍यांमध्ये १९ वर्षीय तरूणीचा समावेश असून या तरूणीसह मतिन डोंगरकर (३५, रा. मुळ कोकणनगर, सध्या माळनाका) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर गांजा विक्री प्रकरणातील आरोपींची संख्या चार झाली आहे.
रत्नागिरीत गांजा येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी शांतीनगर येथे आधीच सापळा लावला होता. गांजा घेवून रत्नागिरीत येणार्‍यांवर पोलीस नजर ठेवूनच होते. गुरूवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर पोलिसांनी अडवलेल्या रिक्षात प्रवीण परब आणि ओंकार बोरकर होते. त्यांच्याकडे आढळलेल्या आठ प्लास्टिकच्या पुरचुडीमध्ये ५५ हजारांचे अंमली पदार्थ आढळून आले. मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी दोघांनाही अटक केली होती. तर त्यांची अंमली पदार्थ असलेली रिक्षा सुद्धा पोलिसांनी जप्त केली होती. दोघांकडे चौकशी केल्यानंतर गांजा पुरवठा करणार्‍या व्यक्ती अन्य असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिसांनी दोघांकडून पुरवठादारांची माहिती काढली. यामध्ये १९ वर्षीय तरूणी गांजा पुरवण्याचा व्यवसाय करत असल्याचे समजताच पोलिसांनाही धक्का बसला. तरूणीचे मूळ गाव कारवांचीवाडी येथील असून ती मतिन डोंगरकर यांच्यासोबत माळनाका येथे एका इमारतीत भाड्याचा फ्लॅट घेवून रहात होती. तेथूनच दोघे गांजा मागवून त्याचा पुरवठा शहरातील अन्य तरूणांना करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९ वर्षीय तरूणी गांजाची पुरवठादार असल्याचे पुढे आल्यामुळे तरूण पिढी या व्यवसायात अडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

जाहिरात :

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page