मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणाच्या काँक्रीटला तडे…

Spread the love

चौपदरीकरणाचे काम सुरू असतानाच तडे गेल्याने नाराजी

संगमेश्वर दि 3 ( मकरंद सुर्वे संगमेश्वर )

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम संगमेश्वर तालुक्यात सुरू आहे.तालुक्यातील आरवली ते बावनदी या अपघातप्रवण क्षेत्रातील एका लेन चे काम पूर्ण करण्यात हात घाई करण्यात येत आहे मात्र धामणी ते आरवली या चौपदरीकरण्याच्या काँक्रीटला तडे गेले असून काही ठिकाणी खड्डे पडण्यास सुरुवात झालेली आहे.
संगमेश्वर तालुक्यामध्ये चौपदरी करण्याच्या कामाला अगोदरच उशीर झाला असून त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत .धामणी ते आरवली दरम्यान केलेल्या चौपदरी करण्याच्या काँक्रीटला तडे गेले असून काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. चौपदरीकरण करून काही दिवस उलटले आहेत मात्र त्या अगोदरच चौपदरी करण्याच्या काँक्रीटला तडे गेल्याने नक्की चौपदरीकरणाच्या कामाचा दर्जा काय आहे असा प्रश्न वाहन चालकांना पडला आहे

फोटो -मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर तुरळ या ठिकाणी कॉंक्रिटीकरणाला पडलेले तडे

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page