
पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांचे आवाहन
संगमेश्वर- कोकणातील सर्वात मोठा सण गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आल्याने उत्सवाच्या निमित्ताने गणेशभक्त व चाकरमानी कोकणात मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात झाली असुन वाहतूक देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण होणार असुन याची काळजी प्रत्येक वाहनधारकांनी घ्यावी त्याचबरोबर रिक्षा चालकांनी रिक्षा नेमून दिलेल्या थांब्यावर लावावी अन्य इतरत्र लावू नये वाहतूक नियम सर्वांनी पाळून गणेशोत्सवास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
सार्वजनिक गणेश मंडळानी मिरवणूक काढतांना स्पीकर वाहनाची विद्युत परवानगी त्या त्या खात्याची घ्यावी; वर्गणी जमा करताना स्वखुशीने देणगी देईल ती घेणे त्यासाठी कोणावर जबरदस्ती करू नये; त्याचबरोबर दही हंडी जास्त उंचावर बांधू नये; उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वानी काळजी घेऊन सर्वच यंत्रणानी सतर्क राहण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी केले.
यावेळी कोंडगाव सरपंच प्रियांका जोयशी उपसरपंच दीप्ती गांधी सदस्य साक्षी चव्हाण जितेंद्र जोयशी मंगेश जोयशी पोलीस निरीक्षक प्रदीप पोवार तंटामुक्ती अध्यक्ष सुप्रिया बेंद्रे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष श्रीधर कबनूरकर कोंडगाव साखरपा सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील मारुती शिंदे रिक्षा चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अनिल किर ग्रामस्थ आदी उपस्थित होते.