अभिनेत्री कंगणा रणौतला भाजपानं हिमाचल प्रदेशमधील मंडी इथून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी दिली आहे. मात्र कंगणाला उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी वादग्रस्त पोस्ट सोशल माध्यामांवर शेयर केली. त्यावरुन देशभरात वादळ निर्माण झालं आहे.
नवी दिल्ली : भाजपानं अभिनेत्री कंगणा रणौतला मंडीमधून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिली आहे. मात्र अभिनेत्री कंगणा रणौतला भाजपानं उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी भाजपावर टीका केली. काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांनी त्यांच्या सोशल माध्यमांद्वारे एक वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्यामुळे देशभर वादंग निर्माण झालं. यावर कंगणानं जोरदार पलटवार केला. त्यानंतर सुप्रिया श्रीनाते यांनी ती पोस्ट आपण केली नसल्याचा दावा केला. मात्र या प्रकरणी भाजपानं आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपानं सुप्रिया श्रीनाते यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.
▪️एका स्त्रीवर अशी पोस्ट करणार नाही :
अभिनेत्री कंगणा रणौतवर वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यानंतर देशभरातून सुप्रिया श्रीनाते यांच्यावर टीका करण्यात येत आहे. मात्र यानंतर सुप्रिया श्रीनाते यांनी “ती पोस्ट आपण केली नाही. माझं सोशल माध्यम हँडल वापरणाऱ्यानं ती पोस्ट केली असेल. मी एका स्त्रीसाठी कधीही खालच्या पातळीवर जाऊन टीका करत नाही. मला ओळखणारा कोणीही याबाबत सांगू शकेल. माझ्या नावाचा गैरवापर करण्यात आला आहे.”
▪️कंगणानं केला जोरदार पलटवार :
भाजपानं हिमाचल प्रदेशातील मंडी इथून अभिनेत्री कंगणा रणौतला लोकसभेची उमेदवारी दिली आहे. कंगणाला उमेदवारी मिळाल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनाते यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी कंगणा आणि भाजपावर हल्लाबोल केला. सुप्रिया श्रीनाते यांनी कंगणावर वादग्रस्त पोस्ट शेअर केली. त्याला कंगणानं जोरदार पलटवार केला आहे. “मी विविध चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत. प्रत्येक महिला सन्मानास पात्र आहे.”
▪️सुप्रिया श्रीनाते यांनी केली पोस्ट डिलीट
कंगणा रणौतवर सुप्रिया श्रीनाते यांच्या सोशल माध्यम हँडलवरुन करण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्टनं मोठी खळबळ उडाली. त्यानंतर भाजपानं आक्रमक पवित्रा घेत सुप्रिया श्रीनाते यांना बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.