बीडमध्ये कंटेनर-कारचा भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू…

Spread the love

बीड- बीडमध्ये आज रविवारी कंटेनर-कारचा भीषण अपघात झाला आहे. पावसामुळे समोरील कांटेनर न दिसल्याने स्विफ्ट कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

हा अपघात अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ झाला. मृत सर्व लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील जगलपूर येथील रहिवासी आहेत. या घटनेत स्विफ्टकारचा चक्काचूर झाला आहे. मृतांची नावे समजू शकली नाहीत. शनिवारी रात्री उशीरा जगलपूर येथील चौघेजण स्विफ्ट कार मधून (एमएच २४ एएस ६३३४) औरंगाबादला जात होते. बीड येथे शनिवारी मध्यरात्री जोरदार पाऊस झाला.

त्यांची कार अंबाजोगाई लातूर रोडवरील पाचपीर दर्ग्याजवळ आली असता, पावसामुळे समोरून येणाऱ्या कंटेनरचा अंदाज चालकाला आला नाही यामुळे कार आणि कंटेनरची जोरदार धडक झाली. ही धडक ऐवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. तर कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी गाडीतून सर्व मृतदेह बाहेर काढले. तसेच हे मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page