खोपोली-सुमित क्षिरसागर- खोपोली येथे प्रथमच संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.पाश्चिमात्य संस्कृतीच्या युगात आपल्या देशातील तरूणांमध्ये संविधानाची मूल्ये आणि तत्वे रूजवणे गरजेचे असल्यानेच अडव्होकेट क्रांती अभंगे गायकवाड यांनी यासाठी पुढाकर घेतला असून या कार्यक्रमात ऍड अमर ननावरे,हरेश कळसेकर,ज्ञानदीप सोनावणे या वक्त्यांचे मोलाचे मार्गदर्शन उपस्थितांना देण्यात आले,दरम्यान कार्यक्रम प्रसंगी रांगोळी आणि वक्तृत्व स्पर्धेचे बक्षिस वितरण करण्यात आले. आपल्या भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.भारतात दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस भारतीय संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.या दिवशी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असून हा दिवस भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
सामाजिक कार्यकर्ते तसेच अडव्होकेट क्रांती अभंगे गायकवाड यांच्या पुढाकाराने खोपोली येथील सुभाष नगर येथे सुभाष नगर ग्रामस्थ मंडळ आयोजित संविधान दीनानिमित्त भारतीय संविधान जनजागृती म्हणून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमावेळी व्यासपीठावर गट अ राजपत्रित अधिकारी,सह सरकारी अभियोक्ता अडव्होकट अमर ननावरे,तर खोपोली पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक हरेश कळसेकर,जमीन हक्क परिषद महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष ज्ञानदीप सोनावणे,ए टी शिंदे,जेष्ठ पत्रकार भाई ओव्हाळ,मंगेश दळवी,नगरसेविका सारिका राजू पिंगळे,
आयोजक ऍड क्रांती अभंगे गायकवाड,प्राजक्ता सोनवणे,समीर गायकवाड ,गोकुळ सोनवणे,भावेश लोखंडे,सुखदेव बॅटटेवर,अशोक गिलबिले,दत्तात्रेय नेहरे,विकी गायकवाड,हेमंत मोरे,सुरेखा खेडेकर, यांसह प्रतिष्ठित नागरिक व्यासपीठावर उपस्थित होते तर समोर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.या कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत सहभाग घेतलेल्याना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व सन्मानपत्रक देण्यात आले.दरम्यान संविधान दिनाचे महत्व काय ?भारतीय राज्यघटनेत अनेक महत्वपूर्ण तत्त्वे आहेत, ज्यांच्या आधारे देशातील सरकार आणि नागरिकांसाठी मूलभूत, राजकीय तत्त्वे, कार्यपद्धती, अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे, कायदे इत्यादी ठरवण्यात आले आहेत.आपल्या देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सर्वात महत्त्वाचा वाटा होता. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी आणि आदरांजली वाहण्याचे प्रतीक म्हणूनही हा भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.म्हणून येथील वक्त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.