प्रतिनिधी – विनोद चव्हाण
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानव विकास संस्था कोकण विभाग आयोजित पहिले कोकण विभागीय पर्यावरण संमेलन नालासोपारा पश्चिम येथे करण्यात आले या कार्यक्रमला पालघरसह महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते या कार्यक्रमला प्रमुख मान्यवर म्हणून महाराष्ट्राचे शिक्षण मंत्री मा. दिपक केसरकर साहेब हे होते त्यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरवात वारकरी पोषक परिधान करून वृक्ष दिंडीची प्रभात फेरी काढण्यात आली. कार्यक्रमाद्वारे आपणास परंपरा आणि संस्कृती दर्शन घडते अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून भावी पिढीला आपल्या परंपरा आणि संस्कृतीची माहिती सांगून जाणीव करून देण्याची आणि त्या जोपासण्याचे संस्कार घडविण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन बापू परब यांनी केले. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे तर कोकण ही देवभूमी आहे त्यामुळे आपल्या परंपरा आणि संतांच्या शिकवणीचा वारसा जपण्यासाठी हा उपक्रम निश्चितच प्रेरणादायी ठरतो असे पालघर जिल्हा अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी मांडले.
पर्यावरण म्हणजे आपल्या भोवतीचा परिसर असे सामान्यपणे म्हणता येईल. यामध्ये आपल्या भोवताली असणारे सगळेच घटक येत असतात. आपल्या भोवतीचे वृक्ष, पक्षी प्राणी, माणूस, जमीन, पाणी, हवा, जंगल, डोंगर, या सर्वाचे एकत्रित असणे म्हणजे परिसर असतो. पर्यावरणात या सगळयाच घटकांचा एकत्रितपणे विचार करण्याची आवश्यकता आहे. म्हणून जमीन, जंगल, पाणी, हवा यांचे संरक्षण व संवर्धन करीता प्रदूषणाला रोखणे व पर्यावरण विषयक जनजागृती करणे आज गरज आहे. असे शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब म्हणले. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित सुंदर असे सादरीकरण सर्वांनी केले केल्याबद्दल अयोजाकाचे आभार.
जैवविविधतेचे जतन व संवर्धन करणे मानवी अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. यास्तव वसुंधरेचं देणं फेडण्यासाठी पर्यावरणाचे रक्षण व संवर्धन करण्याची जबाबदारी तुमची-आमची सर्वांची आहे असे मत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुयोग धस यांनी मांडले. तसेच महाराष्ट्राच्या सर्व नवीन महामार्गाच्या शेजारी वुक्षलागवड करण्यात यावी असे मदत प्राध्यापक दिपक भवर सर यांनी व्यक्त केले. तसेच या कार्यक्रमला पूर्ण कार्यकरणी व विभागीय प्रतिनिधी आणिमहिला प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता.