मुंबईत पुढील महिन्यापासून सुट्ट्या दुधाच्या दरात वाढ होणार आहे. त्यामुळे सणासुदीच्या तोंडावर सामान्यांना मोठा फटका बसणार आहे. सुट्या दुधाच्या दरात दोन ते तीन रुपये वाढ होणार असल्याचा निर्णय एम.एम.पी.एने जाहीर केला आहे
सप्टेंबर महिन्यापासून होणाऱ्या सुट्ट्या दुधाच्या दरामध्ये (Milk Price) वाढ होणार असल्याने सामान्य मुंबईकरांच्या खिशाला मोठा फटका बसणार आहे. मुंबईत पुढील महिन्यापासून सुरू होणाऱ्या सणासुदीच्या आधीच मुंबई दूध उत्पादक संघाने १ सप्टेंबरपासून शहरातील म्हशीच्या दुधाच्या घाऊक दरात प्रति लिटर 2 रुपये दरवाढ जाहीर केली आहे. MMPA अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.